शाहरुखला बनायचं होतं पॉर्नस्टार; म्हणाला, 'Adult सिनेमे आवडायचे कारण...'Shahrukh Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahrukh Khan wanted to become a porn star! Said

शाहरुखला बनायचं होतं पॉर्नस्टार; म्हणाला, 'Adult सिनेमे आवडायचे कारण...'

बॉलीवूडचा 'किंग' म्हणून शाहरुख ची (Shaharuk Khan) प्रसिद्धी याविषयी वेगळं बोलायची गरजच नाही. भारतातच नाही तर जगभरात शाहरुखचे चाहते आहेत. तरुणांपासून वयस्क लोकांपर्यंत सगळ्या वयाच्या गटांमध्ये शाहरुखचे चाहते आहेत. छोट्या पडद्यापासून शाहरुखनं आपलं अभिनय क्षेत्रातील करिअर सुरु केलं आणि आज हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा बादशहा बनून तो राज्य करताना दिसतोय. अर्थातच हा एवढा मोठा प्रवास त्याच्या मेहनतीशिवाय शक्यच नव्हता. पण ९ वर्षापूर्वी शाहरुखनं एक इच्छा व्यक्त केली होती,जी ऐकल्यावर चाहते चक्रावून गेले होते,नव्हे त्यांच्यासाठी तो मोठा धक्का होता. शाहरुख त्यावेळी म्हणाला होता,''मला नेहमीच पॉर्नस्टार(Pornstar) बनायचं होतं. अॅडल्ट सिनेमात काम करण्याची माझी इच्छा होती. एवढा मोठा अभिनेता झाल्यावर अखेर शाहरुख असं का म्हणाला होता. यामागचं कारण खरंतर खूप इंट्रेस्टिंग आहे''.

हेही वाचा: शाहरुख-अजयला कुणी पाठवली 5-5 रुपयाची मनी ऑर्डर? कारणही ऐकाल तर व्हाल थक्क

शाहरुख खान एक चांगला अभिनेता आहे,त्याला चाहत्यांची काही कमी नाही आणि तो प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. ९ वर्षांपूर्वी २०१३ मध्ये शाहरुखनं बॉलीवूडचा नाही तर पॉर्न स्टार होण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो एका कार्यक्रमात बोलला होता,''मला नेहमीच पॉर्न स्टार बनायचं होतं. पॉर्न स्टार बनण्यासंदर्भात माझे विचार स्पष्ट होते,आणि ते काम मी केलं असतं तर त्या कामाचा देखील मी सन्मान केला असता''.

हेही वाचा: कार्तिकच्या 'भूलभूलैय्या 2' ला लागलं ग्रहण; सोशल मीडियावर सिनेमाला विरोध

पण अचानक पॉर्न स्टार बनण्याची इच्छा शाहरुखनं का केली होती? शाहरुखनं याचा खुलासा केला होता. तो म्हणाला होता, ''मी नेहमीच सिल्वेस्टर स्टेलोनचा खूप मोठा चाहता होतो. जो हॉलीवूड सुपरस्टार बनण्याआधी एक पॉर्न स्टार होता''. शाहरुख पुढे म्हणाला होता की,''मी जगातला सर्वात मोठा पॉर्न स्टार झाल्यानंतर पूर्ण अमेरिकेत शानमध्ये मिरवलो असतो''.

हेही वाचा: हॉट मीरा जोशीनं सिनेमाच्या सेटवर चक्क पाटावर बसून घासली भांडी

सिल्वेस्टर स्टेलोन हा हॉलीवूड अभिनेता आहे आणि त्याचं व्यक्तिमत्त्व सगळ्यांना प्रेरित करतं. अर्थातच शाहरुखलाही त्याची भूरळ पडली. सिल्वेस्टरला लहानपणापासून अभिनयाचं वेड होतं. पण त्याच्या जन्माच्या वेळेस डॉक्टरकडून काहीतरी चूक झाली अन् त्याच्या चेहऱ्याचा काही भाग हा पॅरालिसिसचा शिकार झाला. त्यामुळे त्याला बोलण्यातही अडचण यायची. पण असं असूनही त्यानं हार न मानता अभिनयाकडे आपला मोर्चा वळवला. सिल्वेस्टरला अर्थातच त्याच्यातील व्यंगामुळे रिजेक्शनचा सामना करावा लागला. त्यानंतर १९७० मध्ये तो पहिल्यांदा एका अॅडल्ट सिनेमात दिसून आला. त्यानंतर सिल्वेस्टरनं स्वतः एक खुलासा केला होता. तो म्हणाला होता,''त्याला तो राहत असलेल्या अपार्टमेंटमधून हाकलवून देण्यात आलं होतं. खूप दिवस बेघर राहिल्यानंतर मजबूरीनं सिल्वेस्टरनं तो पहिला पॉर्न सिनेमा स्विकारला होता. काही दिवस तर त्यानं स्टेशनवर देखील झोपून काढली आहेत. खूप दिवसं संघर्ष केल्यानंतर त्याच्या 'रॉकी' सिनेमानं धमाका केला. अन् मग त्यानं मागे वळून पाहिलं नाही''. आणि याच सिल्वेस्टरमुळे शाहरुखनंही पॉर्नस्टार बनायचं ठरवलं होतं.

Web Title: Shahrukh Khan Wanted To Become A Porn Star

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top