TMKUC : शैलेश लोढाची पोस्ट चर्चेच; कोणाला मारला टोमणा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shailesh Lodha Latest News

TMKUC : शैलेश लोढाची पोस्ट चर्चेच; कोणाला मारला टोमणा?

Shailesh Lodha Latest News ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा टीव्हीचा लोकप्रिय कॉमेडी शो आहे. अलीकडेच या शोमध्ये शैलेश लोढाच्या (Shailesh Lodha) जागी सचिन श्रॉफ आला आहे. शोमध्ये सचिन तारक मेहताची भूमिका साकारणार आहे. अशात शैलेशने नुकतीच एक पोस्ट टाकली आहे. जी वाचून शोच्या निर्मात्यांची खरडपट्टी काढल्याचे दिसते. मात्र, कवितेत कोणाचेही नाव नाही.

परंतु, शैलेश लोढाने लिहिलेल्या शब्दांवरून कोणाची तरी खिल्ली उडवत असल्याचे स्पष्ट होते. हा टोमणा इतर कोणासाठी नाही तर शोच्या निर्मात्यांसाठी आहे, असा अंदाज युजर्स लावत आहेत. कविता शेअर करीत शैलेशने एक ताजी व्यंगात्मक कविता असे लिहिले आहे. शैलेशची (Shailesh Lodha) ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

‘माझा चेहरा सगळ्यात मोठा असावा, यार तू खूप असुरक्षित आणि घाबरलेला आहेस. व्याख्या सुद्धा कळत नाही. किती वेळा तुम्ही तुमचे म्हणणे बदलता. तुम्हाला जिभेची किंमतही कळत नाही. तुमच्यात आत्मा असता तर विचारले असते, कधी विचार केला होता. एक प्रश्न नक्कीच आहे. तुम्ही शेवटच्या वेळी सत्य कधी बोलले होते’ असे शैलेश लोढाने कवितेत लिहिले आहे.

हेही वाचा: Nora Fatehi : नोरा फतेहीची पाच तास चौकशी; EOW कार्यालयातून आली बाहेर

‘मी तारक मेहताच्या व्यक्तिरेखेमध्ये येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. माझ्या पात्राला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. मी सर्वांना विनंती करेन की शोला असेच प्रेम देत रहा आणि आशीर्वादही’ असे शोमध्ये काम करण्याबाबत सचिन श्रॉफ म्हणाला.

अभिनेत्यावर दडपण असते

केवळ या व्यक्तिरेखेबद्दलच नाही तर जेव्हाही मी काही काम करतो तेव्हा मी नर्व्हस होतो. खरे तर प्रत्येक अभिनेत्यावर चांगले काम करण्याचे दडपण असते असेही सचिन श्रॉफ म्हणाला.

हेही वाचा: Daler Mehndi : गायक दलेर मेहंदीला जामीन; पटियाला कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती

शैलेशने शो का सोडला?

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमुळे इतर संधींकडे दुर्लक्ष करीत असल्याचे शैलेश म्हणाला. शो मधील त्याचे पात्र बरेच दिवसांपासून समोर येत नव्हते. आता नवीन संधी स्वीकारून काहीतरी नवीन करायचे, असे शैलेश लोढाचे म्हणणे आहे.

Web Title: Shailesh Lodha Post Viral Tarak Mehta Ka Ulta Chashma

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..