'सरकारपुढे लाळघोटेपणा करणारेच असं'; 'शक्तिमान' कुणावर भडकला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'सरकारपुढे लाळघोटेपणा करणारेच असं'; 'शक्तिमान' कुणावर भडकला?
'सरकारपुढे लाळघोटेपणा करणारेच असं'; 'शक्तिमान' कुणावर भडकला?

'सरकारपुढे लाळघोटेपणा करणारेच असं'; 'शक्तिमान' कुणावर भडकला?

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई - टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये ज्या मालिकेनं लोकप्रियतेचे सर्वाधिक उच्चांक गाठणारी मालिका म्हणून शक्तिमान या मालिकेचे नाव घेतले जाते. खासकरुन लहान मुलांच्या पसंतीस उतरलेल्या या मालिकेची आठवण आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. प्रसिद्ध अभिनेता मुकेश खन्ना यांनी या मालिकेमध्ये शक्तिमानची भूमिका साकारली होती. मुकेश खन्ना हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जाणारे सेलिब्रेटी आहे. आपले मत परखडपणे व्यक्त करुन त्यावर ठाम भूमिका घेणाऱ्या मुकेश यांनी आता बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीवर टीकेची तोफ डागली आहे.

मुकेश खन्ना यांनी अभिनेत्री कंगनाच्या त्या वक्तव्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी कंगनानं एका कार्यक्रमामध्ये देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याविषयी गंभीर विधान केले होते. त्यामध्ये तिनं आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिळाले होते. खरे स्वातंत्र्य आपल्याला 2014 मध्ये मिळाले आहे. त्यावर मुकेश खन्ना प्रचंड संतापले आहे. त्यांनी यावर सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये त्यांनी कंगनावर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणतात जेव्हा एखादे प्रसिद्ध सेलिब्रेटीच अशाप्रकारची प्रतिक्रिया देतात तेव्हा वाईट वाटते. सरकारप्रती लाळघोटेपणा करणारेच अशाप्रकारे बोलू शकतात. असं शक्तिमान फेम मुकेश यांनी म्हटलं आहे.

मुकेश खन्ना यांनी लिहिलं आहे की, काही वेळा मला असे वाटते की, जेव्हा आपल्या देशावर कोणी काही बोलते तेव्हा त्यावर कुणीच कसे बोलत नाही? मला त्यावर बोलावसे वाटले. हे जे वक्तव्य केले गेले ते सरकारची चापलुसी करणारे आहेत. तेच अशाप्रकारचे वक्तव्य करु शकतात. त्या व्यक्तीचं अज्ञान यानिमित्तानं समोर आलं आहे. आपला देश हा 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. याला वेगळा काही रंग आणि अर्थ देण्याचा जो काही प्रयत्न करण्यात येतो आहे तो चूकीचा आहे. हे मुर्खपणाचे वक्तव्य असल्याची टीका मुकेश खन्ना यांनी कंगनावर केली आहे. यावेळी मुकेश यांनी प्रसिद्ध कॉमेडीयन वीर दास याच्यावरही टीका केली आहे.

हेही वाचा: तिसऱ्या लग्नासाठी आमिर खान तयार; कोण आहे ती अभिनेत्री?

हेही वाचा: कंगना रनौतवर गुन्हा दाखल; शीख समुदायाचा अपमान करणं महागात पडणार

loading image
go to top