'कपिल शर्मा शो बकवास'...कोण म्हणतंय पहा!

'गहराइयां' सिनेमाचा दिग्दर्शक शकुन बत्रानं कपिलविषयी केलंय मोठं वक्तव्य.
Shakun Batra and his Gehraiyaan cast were seen on The Kapil Sharma Show recently.
Shakun Batra and his Gehraiyaan cast were seen on The Kapil Sharma Show recently.Google
Updated on

'गहराइयां'(Gehraiyaan) सिनेमाचा दिग्दर्शक आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नुकताच 'कपिल शर्मा शो' मध्ये गेस्ट म्हणून गेला होता. या कार्यक्रमात जाऊन आल्यानंतर आपल्या मनावरचा,डोक्यावरचा ताण खूप हलका झालाय असं तो म्हणाला आहे. पण असं जरी तो म्हणाला असला तरी त्यानं 'कपिल शर्मा शो'(Kapil Sharma Show) खूप खालच्या दर्जाचा आहे हे देखील एका मुलाखतीत म्हटलं आहे आणि ते ही शो मध्ये जाऊन आल्यानंतर. आता हे ऐकल्यावर कपिलचं काय झालं असेल अन् त्याहीपेक्षा अधिक शो चा निर्माता सलमान खानचं (Salman Khan)काय होईल ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

Shakun Batra and his Gehraiyaan cast were seen on The Kapil Sharma Show recently.
आई कुठे काय करते:देशमुखांचं घर सोडलं, अरुंधती गेली नयनरम्य व्हिलात

'गहराइयां' च्या प्रमोशन निमित्तानं 'कपिल शर्मा शो' मध्ये दिग्दर्शक शकून बत्रानं(Shakun Batra) पहिल्यांदाच हजेरी लावली होती. तो या शो ला फारसं पाहत नसल्यामुळे तो काही गोष्टी शो विषयी फक्त ऐकून होता. त्याही नकारात्मक. यावेळी शो मध्ये शकूनसोबत सिनेमात महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणारी दीपिका पदूकोण(Deepika Padukone),अनन्या पांड्ये,सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्य कारवा अशी मंडळी हजर होती. यावळी कपिलनं यांच्यासोबत एक धम्माल गेम खेळला जो खेळताना कलाकारांची हसून पुरती वाट लागली. हा गेम आपण बिग बॉसमध्ये जे गेस्ट यायचे त्यांच्यासोबत सलमान खान खेळायचा त्यामुळे पाहिलं असेल कदाचित. या कार्यक्रमानांतर शकुननं एका मुलाखतीत 'कपिल शर्मा शो' चं भरभरुन कौतूक केलं. तो म्हणाला,'' शो खूप फनी आहे,लोकांना आवडतो,पण अगदीच सामान्य दर्जाचा आहे,जास्त काही कॉन्टेन्ट नसतो वगैरे,वगैरे असं मी ऐकलं होतं. मी खरंच हा शो फारसा पाहत नसल्यामुळे माझी पाटी कोरी होती. आणि मी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता शो मध्ये गेलो होतो. पण तिथे गेल्यानंतरचा माझा अनुभव कमाल राहिला आहे''.

मी एकतर 'गहराइयां' शूटिंगच्या दरम्यान दीड वर्ष प्रचंड तणावाखाली होतो,खूप काम होतं. आता सिनेमा प्रदर्शित झाल्यावर तो ताण कमी झाला अनं हलकं-हलकं वाटू लागलंय. मी खरंतर कुठल्याच अपेक्षा ठेवून कपिलच्या शो मध्ये गेलो नव्हतो. पण तिथे जाऊन भरभरुन हसू मात्र एन्जॉय करून आलो. आणि खरंच मी माझ्या सिनेमाच्या प्रदर्शनानंतरचा 'हीट-फ्लॉप' चा जो ताण असतो तो अक्षरशः विसरून गेलो. कपिल शर्मा शो मधील 'गहराइयां' टीमच्या एपिसोडचा प्रोमो बातमीत जोडत आहोत. 'गहराइयां' अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. शकुनचा हा तिसरा सिनेमा आहे. दिग्दर्शक म्हणून याआधी त्यानं 'एक मैं और एक तू' आणि 'कपूर अॅन्ड सन्स' हे दोन सिनेमे केले होते. ज्यांना फारसं काही यश मिळालं नव्हतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com