Shamshera : रणबीर कपूरच्या गाडीला अपघात, समशेराच्या ट्रेलरचे होते लॉचिंग

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
bollywood Actor Ranbir Kapoor News
bollywood Actor Ranbir Kapoor Newsesakal

Shamshera Movie: बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रणबीर हा त्याच्या शमशेरा नावाच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निघाला असताना त्याच्या गाडीला अपघात झाल्याची (Ranbir kapoor) घटना घडली आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. पुढील महिन्यात 22 जुलैला त्याचा हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. करण मल्होत्रा दिग्दर्शित शमशेरा या चित्रपटाची गेल्या काही (Bollywood Actors) दिवसांपासून प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्याच्या फर्स्ट लूक आणि टीझरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. (Ranbir Kapoor New Movie News)

रणबीर कपूरनं आपल्या अपघाताची माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यानं म्हटलं (Ranbir kapoor Car Accident news) आहे की, मला आज शमशेराच्या ट्रेलर लॉचिंगसाठी जायचे होते. मी माझ्यावेळेत त्या मॉलसमोर थांबलो होतो. अचानक एका कारनं माझ्या कारला धडक दिली. त्यात माझ्या कारची काच फुटली आहे. माझं सुदैव की मला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. मात्र त्या अपघातानं मी चांगलाच घाबरुन गेलो आहे. त्यानंतर आम्ही तातडीनं शमशेराच्या ट्रेलरच्या कार्यक्रमाला मार्गस्थ झालो.

bollywood Actor Ranbir Kapoor News
Tamasha Live Movie Song: 'नजरेचा हो भाला, थेट काळजावरती घाला!'

यावेळी रणबीरनं पिंकविलाला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलं आहे की, सुदैवानं मला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. गाडीची काच फुटली आहे. यापेक्षा जास्त काही नुकसान नाही. मला शमशेराबाबत कमालीची उत्सुकता आहे. मी संजय दत्त यांचा मोठा फॅन आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली आहे. त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी देखील खास आहे. आजचा दिवस माझ्यासाठी मोठा आहे. शेवटी बहुप्रतिक्षेत अशा शमशेराचा ट्रेलर प्रदर्शित होतो आहे याचा आनंद आहे.

bollywood Actor Ranbir Kapoor News
Dobaaraa Movie: तापसी - अनुराग कश्यपचा 'दोबारा' लंडनच्या महोत्सवात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com