Sharad Ponkshe: भिडे गुरूजी आहेत म्हणून हिंदू धर्माचं कार्य सुरू आहे.. शरद पोंक्षे यांचं मोठं विधान..

शरद पोंक्षे यांच्या विधानाने मोठी खळबळ..
Sharad Ponkshe shared  about sambhaji bhide guruji and hindu religion
Sharad Ponkshe shared about sambhaji bhide guruji and hindu religionsakal

sharad ponkshe : हिंदू जणांचे प्रेरणास्थान पण महाराष्ट्रातील एक चर्चेतलं आणि वादग्रस्त नाव म्हणजे संभाजी भिडे. म्हणजेच सर्वांना परिचित असणारे भिडे गुरुजी.

त्यांचे शिवप्रेम आणि हिंदुत्वाप्रती असलेले कार्य सर्वांनाच ठाऊक आहे, तरूणांना हिंदुत्वाचे धडे देण्यात त्यांनी आयुष्य खर्ची घातलं पण त्यांचं हिंदुत्व आणि कार्यप्रणाली ही कडवी असल्याने त्यांच्यावर टीका देखील होत आली आहे.

मध्यंतरीही त्यांनी 'टिकली लावली नाही' म्हणून एका महिला पत्रकाराचा अनादर केला होता. त्यामुळे त्यांची बरीच चर्चा झाली.

पण याच भिडे गुरुजींविषयी एक महत्वाचं विधान अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

(Sharad Ponkshe shared about sambhaji bhide guruji and hindu religion)

Sharad Ponkshe shared  about sambhaji bhide guruji and hindu religion
Sharad Ponkshe: शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवलं, कारण.. शरद पोंक्षेंचे मोठे विधान..

शरद पोंक्षे सध्या सावरकरांच्या विचारांचा जागर करत महाराष्ट्रभर व्याख्यान देत आहेत. याच प्रवासा दरम्यान ते सांगली मध्ये गेलेले असताना त्यांनी भिडे गुरूंजीची भेट घेतली. या भेटी नंतर पोंक्षे यांनी एक पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये भिडे गुरूंजीविषयी महत्वाचे विधान केले आहे.

पोंक्षे यांनी भिडे गुरुजीं सोबतचे फोटो शेयर करत लिहिले आहेत की, ''आज मिरजेत सायंकाळी व्याख्यान आहे तेव्हा सकाळी सांगलीत मा.भिडेगुरूजींना भेटण्याचा योग आला. ते तरुणांकडून व्यायाम व मारूतीची ऊपायना सुर्यनमस्कार करून घेत होते.''

''छत्रपती शिवाजी महाराज तरूणांना समजाऊन सांगण्यासाठी संपुर्ण आयुष्य खर्च करणारे मा. भिडे गुरूजी यांच्यासारखी माणसं आहेत म्हणून हिंदू धर्माचं कार्य सुरू आहे.'' अशी पोस्ट पोंक्षे यांनी केली आहे.

Sharad Ponkshe shared  about sambhaji bhide guruji and hindu religion
Milind Gawali: मी एक फ्लॉप अॅक्टर आहे, तरीही.. मिलिंद गवळी यांची भावूक पोस्ट..

यावेळी शरद पोंक्षे यांच्यासोबत अभिनेत्र राधिका देशपांडे देखील आहे. राधिका मध्यंतरी तिच्या नाटकावरील पोस्ट मुळे चर्चेत आली होती. आधी तिने शिंदे सरकार वर टीका केली होती, पण शिंदे सरकार कडून तिला मदत होताच हे सरकार कसे उत्तम आहे, असे कौतुक करणारी पोस्ट तिने लिहिली होती. ती राधिका देखील या भेटी वेळी उपस्थित होती.

पोंक्षे यांच्या पोस्टची सध्या बरीच चर्चा असून अनेकांनी पोंक्षे यांचे कौतुक केले आहे. तर काहींनी मात्र 'अंधश्रद्धा, आणि चुकीचे हिंदुत्व पसरवणाऱ्या भिडे गुरुजीं सोबत तुम्हीही मिळाला का' म्हणत पोंक्षेवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com