Namita Thapar: 'शार्क टँक'च्या परिक्षकाची संपत्ती माहितीये?

रियॅलिटी शो चा प्रेक्षकवर्ग मोठा आहे...त्याचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे....
Namita Thapar
Namita Thapar

Entertainment News: रियॅलिटी शो चा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर (viral On social media) त्या शो ची मोठ्या प्रमाणात चर्चा असते. सध्या शार्क टँक (Shark Tank) या रियॅलिटी शो ला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. त्यामध्ये उद्योगपती नमिता थापर (Namita Thapar) या जजच्या भूमिकेत आहे. प्रेक्षकांची पसंतीही त्यांना मिळाली आहे. नमिता थापर या कोट्यवधीच्या मालकीण असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या रियॅलिटी शो मध्ये स्टार्टअपच्या आयडिया घेऊन लोकं येतात. आणि आपली कल्पना परिक्षकांना पटवून देतात. परिक्षकांना ती आयडिया आवडली तर त्या आयडियाचे पैसे ते स्टार्टअप करणाऱ्यांना देतात. असे त्या शो चे स्वरुप आहे.

मुळात परदेशी तोंडवळा असणाऱ्या या शोचं भारतीय स्वरुप म्हणजे हा शार्क टँक आहे. काही दिवसांपूर्वी या शोची निर्मिती करण्यात आली आहे. आणि त्याच्या वेगळेपणासाठी तो चर्चेत आला आहे. आपण पाहत असलेल्या इतर रियॅलिटी शो मध्ये मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटी परिक्षकाच्या भूमिकेत असल्याचे दिसून आले आहे. मात्र या शो मध्ये उद्योगविश्वातील वेगवेगळे मान्यवर यात सहभागी झाले आहेत. त्यामुळे हा शो प्रेक्षकांच्या खास पसंतीचा असल्याचे दिसुन आले आहे.

Namita Thapar
Viral Video : महिलांची अंधश्रद्धा; चारचौघात खाताहेत चाबकाचे फटके

नमिता थापर या शार्क टँकच्या परिक्षक आहेत. त्या प्रसिद्ध उद्योगपती आहेत. सध्या त्या एमक्योर फार्माच्या सीइओ आहेत. याशिवाय त्या इनक्रेडिबल व्हेंचर्स लिमिटेडच्या त्या संस्थापक आणि सीईओही आहेत. थापर यांचा जन्म महाराष्ट्रमध्ये झाला असून त्यांनी पदवीपर्यतचं शिक्षण पुण्यात घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी सीएची पदवी मिळवली आहे. नमिता यांनी अमेरिकामध्ये जाऊन शिक्षण पुर्ण केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या त्यांच्या कामासाठी ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. अमेरिकेवरुन भारतात आल्यानंतर त्यांचा बिझनेस चर्चेत आला आहे. नमिता थापर या 600 कोटींच्या मालकीण असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Namita Thapar
Viral Video : महिलांची अंधश्रद्धा; चारचौघात खाताहेत चाबकाचे फटके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com