Style, Excuse Me चा शर्मन जोशी, साहिल खान 20 वर्षांनी एकत्र!

ज्यांनी स्टाईल आणि एक्स्क्युज मी नावाचे चित्रपट पाहिले असेल त्यांना शर्मन, साहिलविषयी नव्यानं सांगण्याची गरज नाही.
Sharman Joshi Sahil Khan 20 Years Back Style Excuse me
Sharman Joshi Sahil Khan 20 Years Back Style Excuse meesakal
Updated on

Sharman Joshi Sahil Khan 20 Years Back Style Excuse me : बॉलीवूडमध्ये काही विनोदीपटांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यात शर्मन जोशी आणि साहिल खान यांच्या स्टाईल आणि एक्स्क्युज मी या चित्रपटांच्या नावाचा समावेश करावा लागेल. वीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं त्यावेळी बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती.

आता या दोन्ही चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते पुन्हा वीस वर्षांनी एकत्र येणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही सेलिब्रेटींच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ज्यांनी स्टाईल आणि एक्स्क्युज मी नावाचे चित्रपट पाहिले असेल त्यांना शर्मन, साहिलविषयी नव्यानं सांगण्याची गरज नाही. त्यानंतर बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर हे कलाकार नव्या प्रोजेक्टच्या निमित्तानं पुढे येणार आहेत. शर्मन जोशीनं याविषयी अधिकृत माहिती दिली आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

शर्मनच्या करिअरची गाडी स्टाईल या चित्रपटामुळे सुसाट सुटली होती. त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिलं नाही. नुकतीच शर्मनची खफा नावाची वेबसीरिज प्रदर्शित झाली असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. २००३ मध्ये शर्मन आणि साहिलचे ते दोन चित्रपट प्रेक्षकांसमोर आले होते. भन्नाट कॉमेडी, अभिनय यांच्या जोरावर त्या चित्रपटांनी प्रेक्षकांना जिंकून घेतले होते. त्यानंतर बराचकाळ स्टाईलच्या अनोख्या स्टाईलची चर्चा रंगली होती.

Sharman Joshi Sahil Khan 20 Years Back Style Excuse me
Priyanka Chopra : संपत्ती, फेम अन् जगभरात अनोखी ओळख तिची! मात्र जगाला दिसते त्यापेक्षा प्रियंका फारच वेगळी...

स्टाईलनंतर शर्मन आणि साहिलनं पुन्हा एकत्रितपणे काम केले नाही.त्यामागील कारण मात्र अस्पष्ट आहे. शर्मन त्याच्या बाकीच्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त झाला तर साहिलनं फिटनेस बिझनेसमध्ये मोठं नावं कमावलं. आता ते पुन्हा एकत्र येण्यास तयार असून त्यांच्या चित्रपटाचे नाव मात्र अजून ठरलेलं नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मनच्या या नव्या चित्रपटाच्या चित्रिकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्याचे चित्रिकरण अबूधाबीमध्ये होणार असल्याची माहिती आहे.

Sharman Joshi Sahil Khan 20 Years Back Style Excuse me
Shah Rukh Khan Jawan: तु खुप बिझी आहेस भावा.. फॅनने जवानची लांबी विचारल्यावर शाहरुखने दिला भन्नाट रिप्लाय

याविषयी अधिक माहिती देताना शर्मननं सांगितले की, या चित्रपटासाठी मी खूपच उत्साही आहे. साहिलसोबत पुन्हा काम करणे ही मोठी ट्रीट असणार आहे. आमच्या यापूर्वीच्या प्रोजेक्टमधील काम पाहून राजकुमार हिरानी यांनी त्यांच्या थ्री इडियट्ससाठी कास्ट केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.