Shehnaaz Gill: 'हा अपमान आहे', शहनाज गिल भडकली पापाराझींवर

बिग बॉस 13' नंतर शहनाजचे नशीब चमकू लागले. बॉलिवूडमधील चित्रपटांव्यतिरिक्त शहनाज सध्या तिचा शो 'देसी वाइब्स विथ शहनाज गिल' होस्ट करत आहे.
Shehnaaz Gill
Shehnaaz GillSakal
Updated on: 

पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळखली जाणारी शहनाज गिल आता बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी मेहनत घेत आहे. 'बिग बॉस 13' नंतर शहनाजचे नशीब चमकू लागले. बॉलिवूडमधील चित्रपटांव्यतिरिक्त शहनाज सध्या तिचा शो 'देसी वाइब्स विथ शहनाज गिल' होस्ट करत आहे. अलीकडेच, शहनाज गिल तिच्या शोच्या सेटवर पापाराझींनवर भडकली.

शहनाज गिल खूप खोडकर आणि चुलबुली अभनेत्री म्हणून ओळखली जाते, परंतु अनेक वेळा ती पापाराझींनवर भडकतानाही दिसते. सध्या एक व्हिडीओ बघायला मिळत आहे. खरे तर असे झाले की शहनाज जेव्हा मीडियाशी बोलत होती तेव्हा कोणीतरी तिला वारंवार 'शहनाज शहनाज' म्हणत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत होते.

हे ऐकून शहनाज थोडी चिडली आणि ती त्याला आधी गप्प बसायला सांगते. मग ती म्हणते की कोणी बोलत असेल तर व्यत्यय आणणे अपमानास्पद आहे. मग ती कोणालातरी त्या व्यक्तीला गप्प बसायला सांगते आणि तिची मुलाखत देत राहते.

Shehnaaz Gill
Maharashtrachi Hasyajatra: महाराष्ट्र गाजवून हास्यजत्रेची हवा परदेशात, या देशात घालणार धुमाकूळ

शहनाज गिलने काही काळापूर्वी तिचा चॅट शो सुरू केला आहे. यामध्ये आतापर्यंत राजकुमार राव, आयुष्मान खुराना आणि विकी कौशल सारखे सेलिब्रिटी दिसले आहेत. शहनाज महिला स्टारसोबत 2023 सालचा पहिला शो सुरू करणार आहे.

शोमध्ये रकुल प्रीत सिंह दिसणार आहे. अलीकडेच शहनाज गिलनेही तिचा रकुल प्रीत सिंहसोबतचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघी डान्स करताना दिसत आहेत. यादरम्यान रकुल नेव्ही ब्लू कलरच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे, तर शहनाजही ब्लॅक ड्रेससह ब्लू ब्लेझरमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.