Shehnaaz Gill: एअरपोर्टवरील 'तो' व्हिडीओ व्हायरल झाला अन् शहनाझचे चाहते आपापसात भिडले...

बिग बॉस १3 नंतर शहनाझ गिल हे नाव जोरदार चर्चेत आलं,आता लवकरच ती सलमानच्या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.
Shehnaaz Gill pulls away as fan tries to grab her for picture at Mumbai airport. Watch video
Shehnaaz Gill pulls away as fan tries to grab her for picture at Mumbai airport. Watch videoInstagram

Shehnaaz Gill: बिग बॉसनंतर(Big Boss) चर्चेत आलेली पंजाबची कतरिना कैफ म्हणजेच शहनाज गिल. ती सोशल मीडियावरही सतत चर्चेत असते. सध्या शहनाझचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ भलताच व्हायरल झाला आहे ज्यामुळे शहनाझचे चाहते सोशल मीडियावर आपापसात भिडले आहेत. कारण शहनाजसोबत एअरपोर्टवर असं काही घडलं आहे ज्याने लोकांना आणि तिच्या चाहत्यांना देखील धक्का बसला आहे.

Shehnaaz Gill pulls away as fan tries to grab her for picture at Mumbai airport. Watch video
Sharad Pawar: कोल्हेंच्या 'शिवप्रताप गरुडझेप' सिनेमाचा शरद पवारांनी केला रीव्ह्यू, म्हणाले...

शहनाझचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. त्यामध्ये शहनाज गिल एअरपोर्टमधून बाहेर पडताना दिसत आहे. दरम्यान, अचानक एक चाहता तिच्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवू लागतो. मात्र, शहनाज गिल लगेच त्या व्यक्तीपासून दूर जाते आणि दुरूनच फोटोसाठी पोझ देते. इतकंच नाही तर, मीडियाने विचारल्यानंतर शहनाजने अशी प्रतिक्रिया दिली आणि म्हटलं, “तुझे क्या लगा वो मेरा दोस्त है.”

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर शहनाजचे चाहते त्या व्यक्तीवर संतापले आहेत. एका यूजरने शहनाझला फोटोसाठी जवळ खेचणाऱ्या त्या चाहत्याला धमकावत लिहिले आहे- 'माझ्या बाळापासून दूर राहा'. तर दुसर्‍याने लिहिले - 'सनापासून दूर राहा..', तर कोणी लिहिले - 'अरे भाऊ... दुरून'. याचवेळी काहींनी शहनाजची स्तुती करत म्हटलं आहे की, 'शहनाज गिल चांगली आहे. असे कृत्य करूनही तिने त्याला फोटो क्लिक करू दिला'.

Shehnaaz Gill pulls away as fan tries to grab her for picture at Mumbai airport. Watch video
Big Boss Marathi 4: मराठी इंडस्ट्रीत हॅन्डसम अभिनेता कोण? तेजस्विनीनं घेतलं कोणाचं नाव? वाचा

शहनाज गिल आता बॉलिवूड इंडस्ट्रीतही पदार्पण करत आहे. ती लवकरच सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे अजून काही प्रोजेक्ट्स आहेत याचा खुलासा देखील खुद्द शहनाजनं याआधी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com