R Madhavan backs Jacqueline Fernandez as ED names her accused in ₹200 cr extortion case
R Madhavan backs Jacqueline Fernandez as ED names her accused in ₹200 cr extortion caseGoogle

Jacqueline वादग्रस्त प्रकरणावर आर.माधवन म्हणाला,'यामुळे देशाची प्रतिमा...'

महाठग सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून जॅकलिनविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे,यामुळे अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Jacqueline Fernandez : जॅकलिननं (Jacqueline Fernandez) नुकताच आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. पण चार दिवसही तो आनंद तिला टिकवता आला नाही याचं कारण महाठग सुकेश चंद्रशेखर केसप्रकरणात तिचा असलेला सहभाग. आता पुन्हा एक मोठा दणका ईडीनं(ED) तिला दिला आहे. महाठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, या आरोपपत्रात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. ईडीच्यावतीने दिल्ली न्यायालयात पीएमएलए अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अलीकडेच ईडीने जॅकलिनची सुमारे 7 कोटी 12 लाखांची एफडी जप्त केली होती. आरोपी म्हणून जॅकलिनचे नाव आल्याने आता तिच्या अडचणीत वाढ झाली असून, या प्रकरणी ईडीकडून जॅकलिनविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

R Madhavan backs Jacqueline Fernandez as ED names her accused in ₹200 cr extortion case
'कतरिनाशी झटपट लग्न व्हावं म्हणून मी...', विकी कौशलचा करण समोर मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे सुकेश चंद्रशेखरसोबतचे कनेक्शन समोर आल्यापासून ती कायदेशीर अडचणीत सापडली आहे. सुकेशने जॅकलिनला 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू पाठवल्याचं ईडीला आढळून आलं होतं. त्यानंतर ईडीने केलेल्या कारवाईत आतापर्यंत जॅकलिनची 7 कोटींहून अधिकची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. सुकेशने जॅकलिनच्या कुटुंबीयांना महागड्या भेटवस्तूही दिल्याचे तपासात समोर आले होते. यामध्ये कार, महागड्या वस्तू याशिवाय 1.32 कोटी आणि 15 लाख रुपयांच्या निधीचा समावेश होता.

R Madhavan backs Jacqueline Fernandez as ED names her accused in ₹200 cr extortion case
डॅडी v/s शकील; 'दगडी चाळ 2' सिनेमातील नव्या एन्ट्रीनं वेधलं लक्ष

जॅकलिनच्या या वादग्रस्त प्रकरणात आता अभिनेता आर.माधवननं तिला पाठिंबा देत प्रतिक्रिया नोंदवली आहे. आज आर.माधवन त्याच्या धोका-राऊन्ड द कॉर्नर या सिनेमाच्या प्रमोशनसाठी एका प्रमोशनल कार्यक्रमात उपस्थित राहिला होता.

R Madhavan backs Jacqueline Fernandez as ED names her accused in ₹200 cr extortion case
सचिनचं पहिलं लग्न झालंय म्हणून सुप्रियाने नकार दिला होता? जाणून घ्या लव्हस्टोरी

त्याच कार्यक्रमात माधवन म्हणाला,''मला आशा आहे ती संकटातून सहीसलामत लवकच बाहेर पडेल. मला नाही वाटत यामुळे देशाची प्रतिमा खराब होत आहे. उलट,आमच्या सिनेइंडस्ट्रीत खूप कमी लोकांना ईडीच्या छाप्यांचा सामना करावा लागला आहे. इथे सगळेच खूप प्रामाणिकपणे काम करतात. मला नाही वाटत जॅकलिनमुळे इंडस्ट्रीला काही अडचण निर्माण होईल. उलट सगळ्यात जास्त कर वेळेत भरणारे लोक हे सिनेइंडस्ट्रीतूनच आहेत''.

R Madhavan backs Jacqueline Fernandez as ED names her accused in ₹200 cr extortion case
'आपला एखादा मित्र सोडून गेल्यावरती...'; जितेंद्र जोशीची भावूक पोस्ट चर्चेत

'धोका-द राऊन्ड द कॉर्नर' सिनेमात आर.माधवन सोबतच अपराशक्ती खुराना,कौशिक कुमार आणि दर्शन कुमार देखील दिसणार आहेत. हा सिनेमा सप्टेंबर २०२३ मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार,धर्मेंद्र शर्मा आणि विक्रांत शर्मा यांची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com