esakal | Shiddat Trailer: सनी - राधिकाचा वेडेपणा प्रेक्षकांना भावला
sakal

बोलून बातमी शोधा

Shiddat Trailer: सनी - राधिकाचा वेडेपणा प्रेक्षकांना भावला

Shiddat Trailer: सनी - राधिकाचा वेडेपणा प्रेक्षकांना भावला

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - लॉकडाऊनंतर बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या बॅनरचे चित्रपट प्रदर्शित व्हायला लागले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अक्षय़ कुमार, अजय देवगण, या सेलिब्रेटींच्या मोठ्या बॅनरच्या फिल्म प्रदर्शित झाल्या आहेत. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. सध्या बॉलीवूडची अभिनेत्री राधिका मदान आणि सनी कौशल यांच्या शिद्दतचा ट्रेलर व्हायरल झाला आहे. त्याला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी राधिकाचं एक फोटोशुट प्रसिद्ध झालं होतं. त्यात तिनी मिनी स्कर्ट आणि शॉर्ट ब्रा परिधान केली होती. त्यावरुन तिला ट्रोल व्हावं लागलं होतं. सनी कौशल आणि राधिकाच्या ट्रेलरवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही केल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शिद्दतची चर्चा होती. आता प्रेक्षकांना येत्या काही दिवसांमध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता येणार आहे. या चित्रपटामध्ये विक्की कौशलचा भाऊ सनी कौशल हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या जोडीला मोहित रैनाही असणार आहे. त्या ट्रेलरमध्ये राधिका आणि सनीच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी पसंत केलं आहे. त्या ट्रेलरमधून चित्रपटाचा साधारण अंदाज काय असेल याविषयी प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावरुन ती वाचायला मिळत आहे. असे दाखवण्यात आले आहे. चित्रपटाची गोष्ट कार्तिका आणि जग्गीच्या आसपास फिरते. त्यांच्यातील केमिस्ट्री प्रभावी आहे. मात्र त्यांच्या नशीबापुढे त्यांची होणारी हतबलता हे प्रेक्षकांना आवडणार की या कथेला ते नाकारणार हे थो़ड्याच दिवसांत कळेल.

या चित्रपटाचे दिग्दर्शन कुणाल देशमुख यांनी केलं आहे. मेकर्सनं शिद्दतचा ट्रेलर व्हायरल केला आहे. त्याला अल्पावधीतच प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. मेकर्सनं हा ट्रेलर व्हायरल केल्यानंतर असे सांगितलं आहे की, त्यांच्या प्रेमामध्ये 'शिद्दतवाला पागलपन है' प्रेक्षकांना शिद्दतमधील सनी आणि राधिकाची जोडी फार आवडली आहे. हे दोन्ही सेलिब्रेटी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन देखील त्या ट्रेलरचे व्हिडिओ व्हायरल केले आहेत.

हेही वाचा: राधिकाच्या 'स्कर्ट आणि पॉकेट ब्रा'ची चर्चा, फोटो व्हायरल

हेही वाचा: Video: सेम टू सेम सिद्धार्थ शुक्ला, चाहते झाले भावूक

loading image
go to top