शिल्पाची मुलांसोबत अनोखी फुलांची धुळवड! कलरफुल व्हिडीओ व्हायरल Shilpa Shetty | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shilpa Shetty Celebrate Holi with her Kids(Viaan and Samisha)

शिल्पाची मुलांसोबत अनोखी फुलांची धुळवड! कलरफुल व्हिडीओ व्हायरल

आज धुळवडीचा आनंद सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सारेच लुटताना दिसतायत. बॉलीवूडला तर होळी(Holi)ची अनोखी परंपरा आहे. आता फक्त सेलिब्रेशनचे प्रकार बदलत चाललेयत. पूर्वी कपूर,बच्चन यांच्या होळी सेलिब्रेशनचा रंग धम्माल असायचा. दंगा,मस्ती,गाणी,पाण्यात एकमेकांना डुंबवणं,रंगानी माखवणं हे सारं सगळेच बॉलीवूडकर मनापासून एन्ज़ॉय करायचे. आता या मोठ्या प्रसिद्ध धुळवडीच्या सेलिब्रेशनला पूर्णविराम मिळाला असला तरी आजही बॉलीवूडकर आपापल्या कुटुंबासोबत यादिवशी रमताना दिसतात. फरक एवढाच की आज काही जण शांत आणि रंगहीन होळी साजरी करताना दिसत आहेत. एकप्रकारे ते आपल्या माध्यमातून काही चांगले संदेश सर्वसामान्यांना देत आहेत. तसंही अनेक बॉलीवूडच्या सेलिब्रिटींना त्यांचे चाहते आपला आदर्श मानतात.

असाच एक चांगला आदर्श देणारा व्हिडीओ धुळवडीच्या निमित्तानं शिल्पा शेट्टीनं शेअर केला अन् लगोलग तो व्हायरलही झाला. या व्हिडीओत शिल्पा आपला मुलागा वियान आणि समिशा सोबत होळी खेळताना दिसत आहे. तिचा आवाज व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ऐकू येत आहे. ती आपल्या मुलांवर रंगबिरंगी फुलांची उधळण करत 'हॅप्पी होळी' म्हणत शुभेच्छा देत आहे. तर तिचा मोठा मुलगा वियाननेही दोन हातात भरून फुलं घेतलीयत आणि तो फुलं आपली आई व बहिणीच्या अंगावर उधळताना दिसतोय. लहानगी समिशा आपल्यावर उधळल्या जाणाऱ्या फुलांचा आनंद घेताना दिसतेय. केमिकल असलेल्या रंगापेक्षा होळी खेळण्यासाठी शिल्पानं फुलांचा केलेला वापर खूप चांगला संदेश देऊन गेला आहे. नैसर्गिक होळी शेवटी शरीरला हानिकारक ठरत नाही. आणि उधळलेली फुलं खत रुपानं झाडांच्याही कामी येतात, म्हणजे सेलिब्रेशन सुरक्षित अन् फायद्याचंही.

शिल्पानं होळी सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर करत लिहिलंय,''तुमची सगळी दु:ख आणि संकटं या होळीत खाक होवून जाऊ देत. आता सुरु होईल एक नवा सिझन,नवी सुरुवात,नवा आनंद,नवा उत्साह. तुमचं आयुष्य रंगांसारखं कलरफुल होण्यासाठी खुप खुप शुभेच्छा''. अशी एकंदरीत तिची पोस्ट आहे. यावर तिची बहिण शमितानंही तिला होळीच्या शुभेच्छा दिल्यात. तर तिच्या चाहत्यांनी फुलांची अनोखी धुळवड साजरी केल्याबद्दल तिचं कौतूकही केलं आहे. बॉलीवूडच्या वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी यावेळी हा उत्सव साजरा करतानाचे फोटो व्हायरल केले आहेत. त्याला नेटकऱ्यांचा मोठी प्रतिसादही मिळाला आहे. अशातच प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणनं त्याच्या पत्नीसमवेतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. त्यालाही नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आपल्या फिटनेस फ्रीकसाठी मिलिंद ओळखला जातो. सोशल मीडियावर देखील त्याचा चाहतावर्ग मोठा आहे.