अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या मालदिवच्या समुद्रकिनारी सुट्ट्यांचा आनंद लुटतेय. पती राज कुंद्रा, मुलगा व मित्रमैत्रिणींसोबत ती मालदिवमध्ये एंजॉय करतेय. या व्हेकेशनचे फोटो व व्हिडीओ ती सोशल मीडियावर सतत पोस्ट करतेय. त्यापैकीच तिचा बिकिनी लूकमधला व्हिडीओ चाहत्यांना खूपच आवडला असून त्यावर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतोय. अॅनिमल प्रिंट बिकिनीमध्ये शिल्पाचा बोल्ड अंदाज पाहून चाहत्यांनाही कमेंट करण्याचा मोह आवरला नाही.
सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीचा मोठा फॅन फॉलोइंग आहे. मजेशीर व्हिडीओ व फोटो पोस्ट करत ती सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. मालदीव व्हेकेशनचेही सुंदर फोटो व व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. त्यापैकी तिचा बिकिनी लूक चांगलाच व्हायरल झाला आहे. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींनाही शिल्पाचा हा लूक आवडला आहे. बहीण शमिता शेट्टीनेही हार्टचा इमोटिकॉन पोस्ट करत तिच्या लूकला पसंती दर्शविली. तर काहींनी शिल्पाच्याच चित्रपटातील प्रसिद्ध गाण्याच्या ओळी पोस्ट केल्या आहेत. बोल्ड लूकसोबतच शिल्पा तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. योग साधना आणि डाएटचे फंडे ती सोशल मीडियाद्वारे नेटकऱ्यांना सांगत असते.
शिल्पा शेट्टी आगामी 'हंगामा २' या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये तिच्यासोबत मीजान जाफरी आणि परेश रावल मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय ती 'निकम्मा' या चित्रपटातही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटांच्या माध्यमातून शिल्पा बऱ्याच दिवसांनी कमबॅक करणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.