Shilpa Shetty: डोळ्यावर गॉगल, कडक अंदाज! 'बॉलीवूड'ची शिल्पा झाली 'टॉलीवूड'ची 'सत्यवती' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shilpa Shetty:

Shilpa Shetty: डोळ्यावर गॉगल, कडक अंदाज! 'बॉलीवूड'ची शिल्पा झाली 'टॉलीवूड'ची 'सत्यवती'

बॉलिवुडची फिटनेस फ्रिक आणि लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची भलतिच हवा आहे. नुकताच साउथच्या आरआरआरला ऑस्कर मिळाला आहे.

आता बरेच बॉलिवूड कलाकार हे टॉलिवूडकडे वळतांना दिसत आहे. त्यात बॉलिवुडचा बादशाह शाहरुख खान असो किंवा जान्हवी कपुर आता शिल्पा शेट्टीही टॉलिवुडमध्ये दिसणार आहे. ती कन्नड चित्रपटात दिसणार आहे. मात्र, या अभिनेत्रीचे कन्नड इंडस्ट्रीतील पदार्पण नाही. याआधीही तिने कन्नड सिनेमात काम केले आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूडवर जादू दाखवत आहे. 90 च्या दशकातील यशस्वी शिल्पा आता तिची साऊथ सिनेमात तिची जादू पसरवणार आहे.

चैत्र नवरात्री गुढीपाडव्याच्या निमित्त शिल्पा शेट्टीने तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. शिल्पा शेट्टी लवकरच कन्नड सुपरस्टार ध्रुव सर्जाचा आगामी चित्रपट 'केडी द डेव्हिल'मध्ये दिसणार आहे.

या चित्रपटातील शिल्पा शेट्टीचा फर्स्ट लूकही निर्मात्यांनी रिलीज केला आहे. शिल्पाची भुमिका असणारा हा गँगस्टर ड्रामा सिनेमा असल्यांच बोलल जात आहे. यामध्ये शिल्पा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ती सत्यवती च्या भुमिकेत दिसणार आहे.

शिल्पा शेट्टीनेही या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. अभिनेत्री अतिशय दमदार लूकमध्ये दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाची पोल्का डॉट साडी नेसलेली दिसत आहे. डार्क चष्मा घातलेला आणि हातात पर्स घेतलेल्या शिल्पाचा फोटोतुनच स्वॅग पाहायला मिळत आहे.

या पोस्टसोबत शिल्पा शेट्टीने कॅप्शन लिहिले आहे, 'गुढी पाडव्याच्या आणि चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन सुरुवातीच्या या खास दिवशी, मला तुमच्यासोबत हे शेअर करतांना अत्यंत आनंद होत आहे की मी 'केडी द डेव्हिल' चित्रपटात सत्यवतीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

तिच्या या लुकची सध्या सोशल मिडियावर खुप चर्चा सुरु आहे. तिचा हा लुक चाहत्यांना आवडला आहे तर काहींनी तिच्या लुकची तुलना आलियाच्या गंगूबाईसोबत करत आहेत.