esakal | राज कुंद्राच्या अटकेपूर्वी शिल्पाने केलेल्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

raj kundra shilpa shetty

राज कुंद्राच्या अटकेपूर्वी शिल्पाने केलेल्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा Shilpa Shetty पती राज कुंद्राला Raj Kundra अश्लील चित्रपट निर्मितीच्या आरोपप्रकरणी सोमवारी गुन्हे शाखेने अटक केली. 'फेब्रुवारी 2021 मध्ये अश्लील चित्रपट तयार करण्याविषयी आणि काही अ‍ॅप्सच्या माध्यमातून प्रकाशित करण्याबाबत राज कुंद्रा याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात राजला 19 जुलै रोजी आम्ही अटक केली आहे. कारण तो यामागील मुख्य सूत्रधार असल्याचे दिसते', असे मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. पतीच्या अटकेपूर्वी शिल्पाने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. (shilpa shetty social media post before raj kundra arrest)

शिल्पाने तिचा फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले होते, 'आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत असतात ते बदण्याची क्षमता आपल्याकडे काही वेळा नसते. पण आपल्या आत जे घडतंय, ते आपण नक्कीच बदलू शकतो. योगामुळे ते शक्य आहे. मन शांत करण्याची क्षमता वाढवा. नको असलेले विचार कमी करा आणि त्रातक मेडिटेशनद्वारे आपलं लक्ष केंद्रित करा.' तिच्या या जुन्या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा: राज कुंद्रा प्रकरणात आरोपी म्हणून वापरला अभिनेता उमेश कामतचा फोटो

हेही वाचा: शिल्पा शेट्टीचा अश्लील चित्रपट प्रकरणात सहभाग?, पोलिसांनी दिले उत्तर

पॉर्नोग्राफीक व्हिडीओ प्रकरणात शिल्पाची थेट कोणतीही भूमिका नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं होतं. मुंबईचे सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे यांनी सांगितले, 'राज कुंद्राच्या संपूर्ण प्रकरणात शिल्पा शेट्टीची अद्याप कोणतीही सक्रिय भूमिका आढळली नसून तपास सुरू आहे. पीडितांनी पुढे येऊन क्राइम ब्रांच मुंबईशी संपर्क साधावा. आम्ही योग्य ती कारवाई करू.' अश्लील चित्रपट निर्मितीच्या आरोपप्रकरणी राजसह 11 जणांना अटक करण्यात आली आहे.

loading image