Shilpa Raj 3
Shilpa Raj 3Team esakal

शिल्पा शेट्टी घेणार मोठा निर्णय? पोस्टद्वारे दिला संकेत

'आपण भूतकाळ बदलू शकत नाही, पण..'

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने Shilpa Shetty शनिवारी सकाळी इन्स्टा स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली. लेखक कार्ल बार्ड यांच्या पुस्तकातील एक पान तिने शेअर केलं असून त्यात भविष्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 'नवीन शेवट', असं त्याचं शीर्षक आहे. भूतकाळात परत जाऊन कोणीच संपूर्णपणे नवीन सुरुवात करू शकत नाही, पण वर्तमानातून सुरुवात करून कोणीही नवीन शेवट नक्कीच करू शकतं, अशा आशयाची ही पोस्ट आहे.

शिल्पा शेट्टीची पोस्ट-

'आपण घेतलेले चुकीचे निर्णय, केलेल्या चुका, मित्रांना दिलेलं दु:ख यांचं परीक्षण करण्यात आपण खूप वेळ घालवू शकतो. पण फक्त जर आपण अधिक हुशार, अधिक संयमी किंवा चांगले असू तरच. आपण कितीही विश्लेषण करत बसलो तरी भूतकाळ बदलू शकत नाही. पण नव्या मार्गाने आपण पुढे नक्कीच जाऊ शकतो. आधीपेक्षा चांगले निर्णय घेऊन, जुन्या चुका टाळून आणि आपल्यासोबत असलेल्यांशी चांगलं वागून. स्वत:ला नव्याने संधी देण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. भूतकाळात मी ज्या गोष्टी केल्या, त्यावरून माझ्याबद्दलचं मत बनवू नका. मी माझ्या मर्जीनुसार माझं भविष्य घडवू शकते,' अशी ही पोस्ट आहे.

Shilpa Raj 3
सोनू सूदने २० कोटींपेक्षा जास्त कर चुकवला- प्राप्तिकर विभाग

'राज काय करीत होता, माहीत नाही'

मी कामात व्यग्र असल्याने पती राज कुंद्रा नक्की काय काम करत होता, याबाबत काही माहीत नसल्याचा जबाब शिल्पा शेट्टीने दिल्याचे अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून स्पष्ट झाले आहे. कुंद्रा याच्यासह चार जणांविरोधात पोलिसांनी १४६७ पानी आरोपपत्र दाखल केले. त्यात शिल्पाच्या नावाचा समावेश साक्षीदारांच्या यादीत करण्यात आला आहे. शिल्पाच्या जबाबानुसार, राज कुंद्रा याने २०१५ मध्ये 'विआन इंडस्ट्रीज' नावाची कंपनी सुरू केली. त्या कंपनीमध्ये शिल्पाचे २४.५० टक्के समभाग होते. या कंपनीत एप्रिल २०१५ ते जुलै २०२० या कालावधीत शिल्पा संचालक पदावर होती. त्यानंतर तिने वैयक्तिक कारणास्तव संचालकपदाचा राजीनामा दिला.

पोलिसांचा दावा काय?

'हॉटशॉट्स' अॅप्लिकेशन निर्मितीसाठी राज कुंद्राने गुंतवणूक केली असून तो पॉर्नोग्राफी प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे गुन्हे शाखेला मिळाले आहेत. कुंद्रासह मालमत्ता कक्षाने कारवाई करून या अश्लील अॅप्लिकेशनच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुखास अटक केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com