Shivaji Satam
Shivaji Satam

CID मध्ये 'एसीपी प्रद्युमन'ची भूमिका गाजवणारे शिवाजी साटम कामाच्या शोधात

'एक अभिनेता म्हणून मी चांगल्या कामाला मुकतोय आणि प्रेक्षक चांगल्या कलाकारांना मुकत आहेत,' अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

'सीआयडी'मधील (CID) एसीपी प्रद्युमन असो वा 'दे धक्का'मधील तळीराम, कोणतीही भूमिका अगदी सहजरित्या साकारणारा हरहुन्नरी कलाकार म्हणजे शिवाजी साटम (Shivaji Satam). चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून शिवाजी साटम हे प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते कामाच्या शोधात आहेत. "मला बरेच ऑफर्स मिळत आहेत, असं मी म्हणणार नाही. नाही येत तर नाही येत ऑफर्स. एक-दोन ऑफर आहेत, पण त्यात काही करण्यासारखं नाही. मला आवडत असलेल्या प्रोजेक्ट्समध्येच मी काम केलंय", असं ते म्हणाले.

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'हसीन दिलरुबा' या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली होती. "माझ्या वयातील कलाकारांसाठी तशा ताकदीच्या भूमिका लिहिल्या जात नाहीयेत, हे माझं दुर्दैव आहे. हे दोन्ही बाजूंचं नुकसान आहे. एक अभिनेता म्हणून मी चांगल्या कामाला मुकतोय आणि प्रेक्षक चांगल्या कलाकारांना मुकतात. पण यात आपण काही करू शकत नाही", असं ते पुढे म्हणाले.

Shivaji Satam
Video 'ऊ अंटावा' गाण्याची पडद्यामागील धमाल; पहा गणेश आचार्यचा डान्स

१९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सीआयडी' या मालिकेतील शिवाजी यांच्या ‘दया कुछ तो गडबड है’, दया तोड दो दरवाजा’, हे डायलॉग प्रचंड लोकप्रिय झाले. २०१३ मध्ये मालिका सोडून फक्त चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला पण प्रेक्षकांच्या आग्रहामुळे त्यांनी 'सीआयडी'मध्ये पुन्हा काम करण्यास सुरूवात केली. या मालिकेनंतर त्यांना पोलीस अधिकाऱ्याच्याच भूमिका मिळू लागल्या आहेत. "सीआयडी ही मालिका जरी पुन्हा सुरू झाली, तरी मी त्यात काम करण्यासाठी सज्ज राहीन. ती भूमिका साकारून मी कंटाळलो नाही, पण घरी बसून मी खूप कंटाळलो आहे", असं साटम यांनी सांगितलं. १९९८ पासून २०१८ पर्यंत या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

शिवाजींच्या अभिनयातील बारकावे आणि सहजपणा अनेक दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मात्यांच्या पसंतीस पडला. 'वास्तव', 'गुलाम-ए-मुस्तफा', 'सूर्यवंशम', 'नायक', ‘ जिस देश मै गंगा रहता है’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. तसेच मराठीमधील उत्तरायण, दे धक्का, मी शिवाजी पार्क या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com