Shivali Parab: 'सई खुप बोल्ड तर प्राजक्ता माळी ही .....', हास्यजत्रेतील शिवाली परबचं स्पष्टच मत..

Shivali Parab
Shivali ParabEsakal
Updated on

मराठी मनोरंजन विश्वातील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो प्रेक्षकांच्या कमालिचा पसंतीचा आहे. हा शो पाहिल्यानंतर ताणतणाव काही क्षणात नाहीसा होतो असं अनेकांच म्हणणं आहे. सर्वात लोकप्रिय शो मध्ये महाराष्ट्राची हास्यजत्राचे आवर्जून नाव घेतले जाते.

या कार्यक्रमात अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. हास्यजत्रेमुळे अनेक विनोदवीरांना प्रसिद्धी मिळाली आहे. याच शो मधील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री शिवाली परबही.या शोच्या माध्यमातुन ती घराघरात पोहचली.

शिवाली बद्दल बोलायच झालं तर ती एक उत्तम अभिनेत्री आहे. केवळ हास्यजत्रेतच नाही तर तिने चित्रपटांतही काम केलं आहे. ‘प्रेम प्रथा धुमशान’ या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. शिवालीचा आजवरचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता.

Shivali Parab
Sienna Weir Passes Away : घोडेस्वारी करताना अपघातात 23 वर्षीय मॉडेलचं निधन

शिवालीचा तिचा आजवरचा प्रवास, हास्य जत्रेतील गमतीजमती, शिवाली अवली कोहली या कॅरेक्टर पासून तर हास्यजत्रेतील प्रसाद ओक, सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी यांच्याबद्दलच तिचं मत अशा अनेक गोष्टीबद्दल जाणुन घेण्यासाठी सकाळने शिवालीसोबत खास गप्पा मारल्या आहेत.

असे काही खास खुलासे तिने सकाळ Unplugged या पॉडकास्टमध्ये बोलताना केले आहे, तेव्हा या दिलखुलास गप्पा वरील दिलेल्या लिंक वर नक्की ऐका...

(Shivali Parab exclusive interviews in sakal unplugged)

याच मुलाखतीत तिने सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी यांच्याबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. हास्यजत्रे शोच्या वेळी वातावरण कसं असतं त्याचबरोबर तिथे परिक्षक म्हणुन असलेली सई आणि निवेदिका प्राजक्ता माळी हे सेटवर कसे वागतात याबद्दलही ती बोलली.

Shivali Parab
Shiv Thakare: 'आईची ही प्रेमळ माया' आईकडून औक्षण करुन घेत शिव निघाला खतरों के खिलाडीचा गड जिंकायला

अभिनेत्री सई ताम्हणकर ही बऱ्याच काळापासून हास्यजत्रा या शोच्या परिक्षकाची भुमिका साकारत आहे. सई ही खुपच प्रेरणादायी स्त्री आहे. तिला पाहून खुप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तिला असचं बोल्ड आणि बिनधास्त म्हणत नाहीत तर ती तशी आहे. ती विचाराने खुप बोल्ड आहे आणि तिचे बरेच विचार हे मुलींनी घ्यावे असं मला वाटतं. ती माणुस म्हणुन खुप चांगली आहे. सईने अनेक वेळा इतरांना माझं नाव रेफर करत असते.

Shivali Parab
Shivali Parab: हा अभिनेता आहे शिवालीचा क्रश, शिवाली त्याच्या प्रेमात आहे एकदम वेडी

प्राजक्ता माळीबद्दल बोलतांना शिवालीने सांगतिलं की, 'ती खुपच गोड आहे. प्राजक्ता नेहमी चांगल्या गोष्टी सांगत असते. तिला कसलाच गर्व नाही. ती खुप 'डाउन टू अर्थ' आहे. शुटिंग दरम्यान सर्वच लोक थकलेले असतांना तिच्या येण्यामुळे सेटवर नवीन उर्जाच येते.


सकाळ Unplugged मध्ये झालेल्या मुलाखतीत शिवालीने अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे तर दिलेल्या लिंकवर क्लिक करुन मुलाखत नक्कीच ऐका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com