शिवानी विराजस विवाह बंधनात...

अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी यांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नगाठ बांधली.
shivani virajas wedding
shivani virajas weddingsakal

सध्या बॉलिवूडप्रमाणे मराठी मनोरंजन विश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. मराठीत देखील नुकतेच एक कपल विवाह बंधनात अडकले. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी त्यांचा मुलगा विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांच्या विवाहाची चर्चा गेली काही दिवस सुरु होती. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अखेर त्यांनी लग्नगाठ बांधली. (Virajs Kulkarni Shivani Rangole Wedding) त्याचा हा लग्नसोहळा मंगळवारी पुण्यात पार पडला. त्यांच्या मेहंदी समारंभाचेही फोटो विशेष गाजले होते.

shivani virajas wedding
PHOTO : शिवानी रांगोळेच्या मेहंदीचा अनोखा साज.. त्यावर कोरलंय विराजसचं नाव..

विराजस कुलकर्णी (virajas kulkarni) आणि शिवानी रांगोळे (shivani rangole) या दोघांनाही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या लग्नाची माहिती दिली. लग्नाचे काही फोटो शेअर करत त्यांनी 'Finally!' असे कॅप्शन त्याला दिले आहे. म्हणजे अखेर आमचे लग्न झाले असे त्यांनी म्हंटले आहे. अत्यंत पारंपारिक पद्धतीने या दोघांचा लग्नसोहळा पार पडला आहे. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांसह कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

'डावीकडून चौथी बिल्डिंग' या विराजसच्या नाटकात शिवानीनं अभिनय केला होता. तेव्हाच त्यांची ओळख झाली. विराजसनं 'होस्टेल डेज' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. विराजस फक्त अभिनेता नाही तर तो लेखक दिग्दर्शकही आहे. अलिकडेच शिवानी आणि विराजसने एका जाहिरातीसाठी लग्नाचा सीन शूट केला होता. तेव्हा त्यांनी गुपचूप लग्न केलं,अशा चर्चांना खुप उधाण आलं होतं. ते गेली काही वर्षे एकमेकांसोबत असून त्यांचा खरा विवाह मंगळवारी ३ मी रोजी झाला.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com