esakal | लॉकडाऊनमध्ये मोबाईलवर चित्रित आणि दिग्दर्शित झाली 'ही' शॉर्टफिल्म
sakal

बोलून बातमी शोधा

111

सध्या लॉकडाऊनच्या काळात सेलिब्रेटी घरी राहूनच काही ना काही तरी करीत आहेत. कुणी आपल्या फिटनेसचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत आहेत तर कुणी विविध प्रकारची गाणी बनवून कोरोना योद्धांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देत आहे.

लॉकडाऊनमध्ये मोबाईलवर चित्रित आणि दिग्दर्शित झाली 'ही' शॉर्टफिल्म

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई ः सध्या लॉकडाऊनच्या काळात सेलिब्रेटी घरी राहूनच काही ना काही तरी करीत आहेत. कुणी आपल्या फिटनेसचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत आहेत तर कुणी विविध प्रकारची गाणी बनवून कोरोना योद्धांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देत आहे. आता चित्रपट आणि टीव्ही अभिनेता हितेन तेजवानीने 'येस आय वॉज राँग' नावाची शॉर्टफिल्म बनविली आहे. दीपक रुईया यांनी या शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे तर राजीव एस. रुईया यांनी ती घरूनच दिग्दर्शित केली आहे.

वाचा ः संजीताचा अर्जुन पुरस्काराने गौरव? उत्तेजक सेवनाच्या आरोपातूनही मु्क्तता

या शॉर्टफिल्मची कहाणी एका मध्यमवयीन पुरुषाभोवती फिरणारी आहे. आता त्याचे कुटुंब स्थिरस्थावर आहे. मात्र आता त्याला आपण लहानपणी केलेल्या चुकांची आठवण येते आणि त्यामध्ये तो कसा गुंतत जातो याचे चित्रण आहे. यामध्ये मराठमोळा अभिनेता मंगेश देसाई हा देखील आहे. मोनिका राठोरची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. या सगळ्यांनी आपापल्या घरातून मोबाईलवर चित्रीकरण केले आणि त्यानंतर राजीव एस. रुईया यांच्याकडे ते पाठविण्यात आले आणि त्यांनी ही शॉर्टफिल्म तयार केली.  सर्व तांत्रिक बाजू मोबाईलवर करण्यात आल्या आहेत.  

वाचा ः मार्गदर्शकांबरोबर करार संपला आहे, संपवलेला नाही; राही सरनोबतचे स्पष्टीकरण

याबाबत दिग्दर्शक राजीव एस. रुईया म्हणाले, की प्रत्येकाच्या आयुष्यात नात्याला खूप महत्त्व आहे. प्रत्येक जण आपापली नाती व्यवस्थित जपत असतात. पुरुष अनेकदा चुका करीत असतात. त्यामध्ये छोट्या छोट्या चुकांमुळे गुंतागुंत वाढत जाते आणि मग परिस्थिती सामान्य व्हायला खूप अडचणी येतात. ही शाॅर्टफिल्म यावरच बेतलेली आहे. अभिनेता हितेश तेजवानीने सांगितले की , ही माझी पहिली व्यावसायिक शाॅर्टफिल्म आहे. आम्ही लॉकडाऊनच्या काळात सरकारी नियमांचे पालन करीत ही फिल्म बनविली आहे. आम्ही सर्व कलाकारांनी आपापल्या घरी राहून राजीव यांच्या आदेशानुसार चित्रीकरण केले. आम्ही सर्व जण अजूनही एकमेकांना भेटलो नाही. प्रत्येकाने पाहावी अशी ही फिल्म आहे.