Video:श्रद्धा कपूरने ऑटो राईडचा आनंद घेत केली मुंबईची सफर Shraddha Kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shraddha Kapoor

Video:श्रद्धा कपूरने ऑटो राईडचा आनंद घेत केली मुंबईची सफर

बॉलीवूडचे प्रसिद्ध खलनायक शक्ती कपूर(Shakti Kapoor) यांची मुलगी तर प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेची सख्खी भाची असलेल्या श्रद्धा कपूरनं(Shraddha Kapoor) स्वतःच्या हिमतीवर आपलं करिअर घडवलं आहे. हे आम्ही सांगत नाही आहोत तर तिच्या वडिलांनी आणि मावशीने अनेकदा त्यांच्या मुलाखतीतून हे सांगितलेलं आहे. परदेशात शिकतानाच कसं श्रद्धानं एक प्रयत्न म्हणून आपले काही फोटो बॉलीवूडच्या काही दिग्दर्शकांना पाठवले, ऑडिशन दिली आणि मग रितसर निवड होऊन तिला तिचा पहिला सिनेमा मिळाला. हे तिच्याआधी तिच्या घरच्यांनी तिच्याविषयी बोलताना सांगितलं. ती दिसायला सुंदर आहेच पण हळूहळू तिनं आपल्या अभिनयातही सुधारणा करीत नृत्यातील कलागुणांच्या जोरावर काही चांगले सिनेमे आपल्या नावावर केले आहेत. श्रद्धा सोशल मीडियावरही खुप सक्रिय पहायला मिळते. नुकताच तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे,जो तुफान व्हायरल झाला आहे.

हेही वाचा: तेजस्वी प्रकाश विनर कशी झाली?हे तर फिक्स्ड,ट्वीटरवर नवीन वाद सुरू....

श्रद्धानं नुकताच रिक्षात बसून मुंबई फिरण्याचा आनंद घेतला आहे. रविवारच्या दिवशी रिक्षातून सफर करतानाचा व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. काळ्या रंगाचा सिम्पल लूकचा टॉप तिनं घातलेला दिसत आहे. तोंडावर मास्क मात्र तिने परिधान केलेला दिसत आहे. यामुळे कोरोनामुळे घालण्यात आलेल्या निर्बंधांचे ती काटेकोरपणे पालन करताना दिसत आहे. तिनं हा व्हिडीओ रिक्षात बसून शूट केलेला आहे. या व्हिडीओला तिनं कॅप्शनही अगदी समर्पक असे दिले आहे. ''तुमचा परफेक्ट रविवार कसा आहे? माझा तर ऑटो राईड, वाऱ्याने उडणारे केस आणि जुनी गाणी…' असे तिने यात म्हटले आहे.

श्रद्धाच्या या व्हिडीओला तिच्या अनेक चाहत्यांनी लाईक केले आहे. तिनं रिक्षाने प्रवास केला यासाठी तिचे कौतूक केले आहे. तर कमेंट बॉक्समध्येही लिहिले आहे की,''सेलिब्रिटींसाठी मास्क दोन प्रकारे फायद्याचा सद्यस्थितीत. एक कोरोनापासून(Corona) बचाव तर दुसरा तुमची ओळख लपवण्यासाठीही फायद्याचा''. तर अनेकांनी तिनं मास्क लावून प्रवास केला याबद्दल तिचं कौतूक केलं आहे. श्रद्धा लवकरच निर्माता-दिग्दर्शक लव रंजन यांच्या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही. या सिनेमात श्रद्धा कपूरसोबत रणबीर कपूर (Ranbir Kapoor)मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Shraddha Kapoor Auto Ride Video Viral Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top