अभिनेत्री श्रद्धा कपूरने लिहिले मराठीत पत्र; पण कोणाला..?

संतोष भिंगार्डे
गुरुवार, 16 जुलै 2020

श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर नुकताच 50 मिलियन फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. त्यामुळे तिने स्वहस्ताक्षरात इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत आपल्या चाहत्यांना पत्र लिहिले आहे आणि आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.  

मुंबई : आपल्या चाहत्यांसाठी सेलिब्रेटी काय करतील आणि काय नाही हे काही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावरून अनेक सेलिब्रेटी आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचत असतात. आपल्या विविध कामांची माहिती ते आपल्या चाहत्यांना देत असतात. आता अभिनेत्री श्रद्धा कपूरने आपल्या चाहत्यासाठी स्वहस्ताक्षरात पत्र लिहिले आहे. 

मुंबईचे एक पाऊल पुढे; गतवर्षीच्या तुलनेत बारावीच्या निकालात 'अशी' झाली वाढ...

श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर नुकताच 50 मिलियन फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. त्यामुळे तिने स्वहस्ताक्षरात इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत आपल्या चाहत्यांना पत्र लिहिले आहे आणि आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.  

शुल्कासाठी खारघरमधील शाळेचा असाही प्रताप; ऑनलाईन शिक्षणच केले बंद...

श्रद्धा कपूरने आतापर्यंत कित्येक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच अॅक्टिव्ह असते आणि आपल्या कामाबद्दलची तसेच आवडीनिवडीबद्दलची माहिती आपल्या चाहत्यांना देत असते. तिच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे तिने एक स्वतः पत्र लिहिले. विशेष म्हणजे मराठी भाषेतही तिने पत्र लिहिले आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor) on

 

''माझ्या सर्व प्रिय हितचिंतकांनो, तुम्ही प्रेमाने बनवलेल्या व्हिडीओ आणि पोस्ट मी पाहिल्या आणि माझे मन भरून आले. मी तुमच्या सर्वांमुळे इथे आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून भरपूर प्रेम, असेच सुखी आणि आनंदी रहा. कृपया स्वत:ची काळजी घ्या आणि एकमेकांसोबत प्रेमाने रहा. धन्यवाद.. धन्यवाद.. धन्यवाद..! 50 मिलियन वेळा..!''
– श्रद्धा 

----
संपादन :  ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shraddha kapoor writes letters to her fans in marathi