श्रद्धा कपूरही आणि सारा अली खान एनसीबी कार्यालयात  

sara ali khan-shraddha kapoor are now in ANCB office for introgation.jpg
sara ali khan-shraddha kapoor are now in ANCB office for introgation.jpg

मुंबई :  एनसीबीच्या कार्यालयात आता अभिनेञी श्रध्दा कपुरसह सारा अली खान देखील  हजर झाली आहे.  शनिवारी सकाळी चौकशीसाठी बोलवण्यात आलेल्या दिपिकाकडुन समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. यावर श्रध्दा आणि सारा यांच्याकडुन काही नवीन काही माहिती मिळते का याकडे एनसीबीचे लक्ष असणार आहे.  

अभिनेत्री दीपिका पदुकोण नंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सारा अली खान चौकशीसाठी शनिवारी दुपारी एनसीबी कार्यालयात दाखल झाल्या . ड्रग्जप्रकरणी नाव आल्यामुळे दोघींना बुधवारी एनसीबीने समन्स बजावले होते. तिच्या पाठोपाठ सारा अली खान एनसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी गेली. बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोणसोबत श्रद्धा कपूर आणि सारा अली खानचंदेखील नाव समोर आलं आहे.

२५ सप्टेंबर रोजी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि दीपिका पदुकोनची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांची एनसीबीने चौकशी केली. यात जवळपास चार तास रकुलची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज दीपिका पदुकोन, ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत .एनसीबीकडून त्यांची चौकशी केली जात आहे. रकुलसोबत, श्रद्धा कपूर आणि सारा खान यांची एनसीबीकडून सध्या चौकशी सुरु आहे.   

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्जच्या प्रकरणात एनसीबी तपास करत आहे. रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर या तपासात आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर आली. सुशांतच्या लोणावळ्यातील शेतघरी केलेल्या चौकशीत एनसीबी पथकाला श्रद्धाबाबत माहिती मिळाली होती.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com