
Dilip Kumar यांचा एकच सल्ला अन् लता मंगेशकरांचं नशीबच चमकलेलं..एकामागून एक हिट झाली होती गाणी
Dilip Kumar bond with Lata Mangeshkar: बॉलीवूडसाठी मागची काही वर्ष खास राहिली नाही. जिथे एकीकडे बॉलीवूडच्या सिनेमांची कमाईच्या बाबतीत बोंब सुरू आहे तिथे दुसरीकडे अनेक दिग्ग्ज कलाकारांनी गेल्या काही दिवसांत या जगाचा निरोप घेतल्यानं बॉलीवूड पुरतं डळमळताना दिसलं.
यामध्ये दोन मोठी नावं होती लता मंगेशकर आणि दिलीप कुमार. दोघंही इंडस्ट्रीतील दोन अनमोल हिरे. काही दिवसांपूर्वी श्रेया घोषालनं सिंगिंग रिअॅलिटी शो सा रे गा मा पा मध्ये एक किस्सा शेअर केला.
हा किस्सा तिनं लता मंगेशकर यांचे स्मरण करत शेअर केला होता. तिनं हा किस्सा शेअर केल्यानं इंडस्ट्रीत करिअर करू पाहणाऱ्या नव्या टॅलेंटला प्रेरणा मिळाली हे मात्र नक्की.(Shreya Ghoshal Share lata mangeshkar and dilip kumar incident)
श्रेया घोषालनं सांगितलं की करिअरच्या सुरुवातीला एकदा लता मंगेशकरांना दिलीप कुमार म्हणाले होते की, '' त्या एखादं गाणं गातात त्याच्यात मराठी अॅक्सेंट जाणवतात''.
त्यावेळी हिंदी गाण्यांमध्ये उच्च दर्जाचं हिंदी आणि उर्दू भाषेचा अधिक वापर केला जायचा. त्यावेळी उर्दू शायर जास्तीत जास्त गाणी लिहायचे. त्यामुळे लता दिदिंचे हिंदी-उर्दू फारसे चांगले नसल्यानं ते त्यांच्यासाठी अधिक उर्दू -हिंदी शब्द लिहिणं पसंत नाही करायचे.
त्यावेळी लता मंगेशकरांना दिलिप कुमार यांनी सांगितलं की हिंदी-उर्दू बोलताना त्यांची गडबड झालेली कळून येते. हे ऐकून लता मंगेशकर चिंतीत झाल्या. त्यांनी उर्दू भाषा शिकली आणि आपल्या उच्चारांमध्ये सुधारणा केली.
उर्दू शिकल्यानंतर लता मंगेशकर इतकं अस्खलित हिंदी-उर्दू बोलू लागल्या की पुन्हा कधी कुणी त्यांच्या गाण्याच्या उच्चारांमध्ये खोट काढली नाही.
दिलीप कुमार यांच्यापेक्षा वयाने लता दिदि छोट्या होत्या..त्या दिलीप कुमार यांना 'भैय्या' म्हणून संबोधायच्या. रक्षाबंधनच्या दिवशी त्या सुरुवातीच्या सक्रिय दिवसांत नेहमीच दिलीप कुमार यांना राखी बांधायच्या. त्यांनी दिलीप कुमार यांच्या अनेक सिनेमासाठी गाणी गायली आहेत.
लता मंगेशकर फिल्म जगतात सर्वांसाठी एक प्रेरणास्त्रोत राहिल्या आहेत. त्यांनी सात दशकं इंडस्ट्रीवर राज्य केलं. त्यादरम्यान त्यांनी अनेक सिनेमांत गाणी गायली.आपल्या गायकीनं त्यांनी केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला प्रभावित केलं.
संगीतक्षेत्रातील त्यांचे योगदान पाहता त्यांना 'भारतरत्न' नावानं म्हणूनच सम्मानित केलं गेलं. तर दिलीप कुमार यांच्याविषयी बोलायचं झालं तर या ट्रॅजिडी किंगला त्याच्या शानदार अभिनयासाठी ओळखलं जातं आणि 'पद्मविभूषण' पुरस्कारानं त्यांना सम्मानित करण्यात आलं आहे.