Shubhangi Atre : 'पुरुष अभिनेत्यांना नेहमीच...' अंगुरी भाभी बोलून गेली!

आता शुभांगीनं तिला टीव्ही मनोरंजन विश्वातील त्या अन्यायकारक गोष्टींविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.
Shubhangi Atre
Shubhangi Atreesakal

Shubhangi Atre tv entertainment actress compare male actor dominance : भाभीजी घर पर है या लोकप्रिय मालिकेतील प्रसिद्ध सेलिब्रेटी शुभांगी अत्रे ही तिच्या वेगवेगळया वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. शुभांगीनं या मालिकेमध्ये अंगुरी भाभीची भूमिका केली होती. त्यानंतर आता तिनं पुन्हा एकदा टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये काय चालते याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.

आता शुभांगीनं तिला टीव्ही मनोरंजन विश्वातील त्या अन्यायकारक गोष्टींविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे शुभांगी चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शुभांगी ही तिच्या परखड वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. शुभांगीनं तिच्या एका मुलाखीमध्ये म्हटले आहे की, मी पहिल्यांदा डेली सोपमध्ये काम करायला सुरुवात केली. तेव्हा टीव्ही मनोरंजन विश्वाविषयी काय चालते हे मला माहिती नव्हते.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

यापूर्वी कित्येक टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्रींनी त्यांना जाणवणाऱ्या त्या अन्यायकारक गोष्टींविषयी सांगितले होते. पुरुष कलाकारांना मिळणारी वागणूक आणि एखाद्या महिला अभिनेत्रीला वागणूक यामध्ये फरक असल्याची प्रतिक्रिया शुभांगीनं दिल्याचे दिसून आले आहे. तिचं ते बोलणं आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. शुभांगीनं एखाद्या महिला अभिनेत्रीला कशाप्रकारे त्रास दिला जातो हे पाहिल्यावर वाईट वाटते. असे म्हटले आहे.

Shubhangi Atre
The Kerala Story : केरळ स्टोरीच्या सोनिया बलानीला जीवे मारण्याची धमकी!

एका मुलाखतीमध्ये शुभांगीनं परखड मतप्रदर्शन केले आहे. यामध्ये तिनं म्हटले आहे की, इंडस्ट्रीमध्ये पुरुष कलाकारांच्या गोष्टींना अधिक प्राधान्य दिले जाते. तसेच त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की त्यावर पटकन विश्वास ठेवला जातो. आणि त्याची कार्यवाही देखील होते. अशी खंत शुभांगीनं व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com