Shweta Bachchan : 'आईची तिच गोष्ट मला आवडत नाही, ती नेहमीच...' लेक श्वेता जया बच्चन विषयी काय बोलली?

नव्या नवेलीच्या पॉडकास्टमध्ये श्वेता बच्चननं (Shweta Bachchan) आई जया बच्चन यांच्याविषयी वेगवेगळ्या गोष्टी शेयर केल्या आहेत.
Shweta Bachchan and Jaya Bachchan
Shweta Bachchan and Jaya Bachchan esakal

Shweta Bachchan Comment On Jaya Bachchan : बॉलीवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन, जया बच्चन यांची लाडकी लेक श्वेता बच्चन ही तिच्या बेधडक अंदाजासाठी ओळखली जाते. ती सध्या तिच्या लेकीच्या (Shweta Bachchan Comment On Jaya Bachchan latest news) नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टमुळे चर्चेत आल्याचे दिसून आली आहे. त्यात तिनं आई जया बच्चन यांच्याविषयी केलेलं वक्तव्य नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

त्या पॉडकास्टमध्ये नव्यानं श्वेताला विचारले की, आजीची कोणती गोष्ट (Navya Naveli Nanda Podcast) तुला अजिबात आवडत नाही? त्यात श्वेतानं जयाजींच्या ज्या काही वेगवेगळ्या सवयी आहेत त्याविषयी श्रोत्यांना, दर्शकांना सांगितले आहे. व्हाट द हेल नव्या...असे नव्याच्या पॉडकास्टचे नाव आहे. जे लोकप्रिय आहे. त्या प्रश्नाचे उत्तर देताना श्वेता म्हणाली, आई जेव्हा केसांना तो कांद्याचा ज्युस लावते ते मला अजिबात आवडत नाही.

त्या कांद्यांचा वास मला खूप बैचेन करतो. मला तिची ती सवय अजिबात आवडत नाही. त्याविषयी मी तिला अनेकदा सांगितलं आहे. पण ती काही (Jaya Bachchan News) ऐकायला तयार नाही. असेही नव्यानं म्हटलं आहे. श्वेता बच्चन पुढे म्हणते, एखाद्या लहान मुलाप्रमाणे ती झोपते, थोडासाही आवाज झाला की, तिला जाग येते. तसेच दरवेळी पुढच्या दिवशी काय होणार याचं तिला खूपच टेन्शन येतं. नव्याच्या पॉडकास्टचा आगामी एपिसोड हा 'ब्यूटी सिक्रेट्स फॉर द एजेज' या नावानं आहे.

Shweta Bachchan and Jaya Bachchan
Kavita Chaudhary Death : 'उडान' फेम अभिनेत्री कविता चौधरीचं निधन, ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

प्रेमात एकमेकांना आदर देणं गरजेचं...

नव्याच्या व्हाट द हेल नावाच्या पॉडकास्टमध्ये श्वेता बच्चन आणि जया बच्चन यांचा तो एपिसोड खास लोकप्रिय झाला होता. त्यात श्वेतानं जया बच्चनविषयीच्या खास आठवणींना उजाळा दिला होता. जयाजी म्हटल्या होत्या की, प्रेमात सगळ्यात जास्त महत्वाचे असते ते एकमेकांचा आदर करणं, जर तुमचा जोडीदार तुमच्यावर हात उगारत असेल तर तुम्ही ते सहन करण्याची गरज नाही.

प्रेमामध्ये हिंसेचे समर्थन करता येत नाही. ते करु नये,प्रेमात हिंसेला जागाच नाही. अशा शब्दांत जयाजींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्याची चर्चा झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com