सिद्धार्थ चांदेकर-पर्ण पेठेची 'अधांतरी' वेब सीरिज

वेब सीरिजमध्ये विराजस कुलकर्णी, आशय कुलकर्णी आणि आरोह वेलणकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका
सिद्धार्थ चांदेकर-पर्ण पेठेची 'अधांतरी' वेब सीरिज

सिद्धार्थ चांदेकर Siddharth Chandekar आणि पर्ण पेठे Parna Pethe हंगामा प्लेच्या 'अंधातरी' या आगामी ओरिजनल मराठी वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या शोमध्ये लोकप्रिय अभिनेता विराजस कुलकर्णी, आशय कुलकर्णी आणि आरोह वेलणकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अधांतरी ही काहीशी मजेशीर, प्रेमळ आणि प्रत्येकाला आपलीशी वाटेल अशी रोमँटिक कॉमेडी ड्रामा कथा आहे. लाँग-डिस्टन्स नात्यात असलेल्या जोडप्याला काही कारणांमुळे बराच काळ एकत्र राहावे लागते. ही कारणे त्यांच्या नियंत्रणाबाहेरील आहेत. क्लासमेट, लॉस्ट अॅण्ड फाऊंड, ऑनलाइन बिनलाइन, गुलाबजाम, रणांगण अशा मराठी सिनेमांमधील भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सिद्धार्थ चांदेकर याच्या सांग तू आहेस का? जीवलगा, प्रेम हे, सिटी ऑफ ड्रिम्स आणि इतर मालिकांमधील भूमिकाही गाजल्या.

अंधातरीमधील आपल्या व्यक्तिरेखेविषयी तो म्हणाला, "मागील वर्षभरात प्रत्येक जोडप्याला जो अनुभव आला आहे असाच काळ यात आहे. त्यामुळे ही कथा फारच आपलीशी वाटते. शिवाय, पर्ण आणि माझी व्यक्तीरेखाही अगदी तुमच्या-आमच्यासारखी आहे. प्रत्येक जोडपं बांधिलकी, अनुरूपता आणि एकमेकांशी अधिक घट्ट बंध असावेत अशी अपेक्षा करतो. या शोमध्ये हे सगळे प्रश्न काहीशा नाट्यमय मात्र विनोदी पद्धतीने मांडण्यात आले आहेत."

सिद्धार्थ चांदेकर-पर्ण पेठेची 'अधांतरी' वेब सीरिज
'झी मराठीने खूपच मनावर घेतलेलं दिसतंय'; नव्या मालिकांवर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

फास्टर फेणे, फोटोकॉपी, बघतोस काय मुजरा कर, वायझेड, रमा माधव हे सिनेमे आणि अनेक नाटकांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली पर्ण पेठे म्हणाली, "परफेक्ट नसलेल्या लोकांच्या जगात एकदम परफेक्ट बसणारी कथा आहे अंधातरीची. मी मुग्धा या मुंबईतील एका मुलीची भूमिका साकारली आहे. ती लाँग डिस्टंस रिलेशनशीपमध्ये आहे. मात्र, बॉयफ्रेंडसोबत खूप मोठा काळ घालवाला लागतो तेव्हा एकेक गोष्टी स्पष्ट होत जातात. हल्लीच्या आधुनिक जगात नातेसंबंध टिकवून ठेवणे लोकांसाठी फारच कठीण झाले आहे. अशा जगातील अनेक गोष्टींचं प्रतिबिंब यात दिसेल."

माझा होशील ना ही मालिका आणि रिक्षा रोको मित्रमंडळ, मादुरी आणि हॉस्टेल डेज अशा सिनेमांमध्ये झळकलेला विराजस कुलकर्णी म्हणाला, "ही प्रेमकथा असली तरी अधांतरी ही प्रेक्षकांनी पाहिलेल्या इतर कथांपेक्षा वेगळी आहे. यातलं जोडपं एकमेकांना अधिक नीट जाणून घेण्याचा प्रयत्न करतंय आणि त्याचवेळी काही अनपेक्षित प्रसंगांचाही अनुभव घेतंय. या शोमधील व्यक्तिरेखांमध्ये प्रेक्षकांना स्वत:मधील काही गोष्टी दिसतील, असं मला वाटतं."

रेगे, घंटा हे सिनेमे आणि लाडाची मी लेक गं, गुलमोहर, बिग बॉस मराठी 2 साठी ओळखला जाणारा आरोह वेलणकर म्हणाला, "अधांतरी ही साधी मात्र फार वेगळी कथा आहे. या कथेच्या अंतरंगात बरंच काही आहे. या शोमध्ये माझी छोटीशी भूमिका असली तरी या शोमध्ये असावं असं मला वाटलं कारण एक अभिनेता म्हणून तुमच्याशी संवाद साधणाऱ्या कथेचा भाग असणं तुम्हाला नेहमीच आवडतं."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com