Sidharth Malhotra: कियारा आधी 'या' अभिनेत्रींबरोबर रंगल्या सिद्धार्थच्या अफेयरच्या चर्चा

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा 6 फेब्रुवारीला लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत आणि सर्व कार्यक्रम 5 फेब्रुवारीपासून सुरू होतील आणि 8 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत.
KIARA ADVANI SIDHARTH MALHOTRA
KIARA ADVANI SIDHARTH MALHOTRA esakal

बी-टाऊनचे सर्वात लाडके लव्ह बर्ड मानले जाणारे सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी सध्या त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट केलेले सिद्धार्थ आणि कियारा यांनी लग्नाच्या बातमीवर अद्याप आपली प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र त्यांच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा 6 फेब्रुवारीला लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत आणि सर्व कार्यक्रम 5 फेब्रुवारीपासून सुरू होतील आणि 8 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत. दरम्यान कियारा ही सिद्धार्थची पहिली पसंती नाही. याआधीही त्याच्या रिलेशनशीपच्या चर्चा रंगल्या आहेत. अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे नावं जोडले गेले आहे.

KIARA ADVANI SIDHARTH MALHOTRA
Sidharth-Kiara: अखेर मुहूर्त ठरला! 'या' दिवशी वाजणार सिद्धार्थ अन् कियाराच्या लग्नाचा बॅण्ड..

2012 मध्ये करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयरमधून बॉलिवूडमध्ये सिद्धार्थ आणि आलिया भट्टने एकत्र पदार्पण केले. तेव्हा पासून या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा होऊ लागल्या. त्यांची जोडी नेहमीच चर्चेत राहिली. जरी दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीच उघडपणे बोलले नाहीत. 2017 मध्ये त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली आणि दोघेही त्याच्या आयुष्यात पुढे गेले.

2017 मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​'अ जेंटलमॅन'मध्ये चित्रपटामध्ये जॅकलिनसोबत दिसला होता, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला मात्र त्यांनतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. जॅकलिनसोबतच्या नात्याबद्दल बोलताना तो म्हणाला की जॅकलिन अप्रतिम आहे. मला तिच्यासोबत प्रवास करायला मजा येते. आम्ही दोघं 'अ जेंटलमन' करत होतो तेव्हा दोघेही चांगले मित्र झालो. आम्ही कधीही डेट केले नाही. सिद्धार्थच्या आलियासोबतच्या ब्रेकअपचे कारणही जॅकलिन असल्याचं सांगण्यात आलं होतं, पण ती केवळ अफवा होती.

KIARA ADVANI SIDHARTH MALHOTRA
Rakhi Sawant: आदिल मी तुला सोडणार नाय! राखीनं भरला नवऱ्याला दम...

जॅकलिननंतर सिद्धार्थ मल्होत्राचे नाव तारा सुतारियाशी जोडले गेले. त्यांची भेट 'मरजावां' चित्रपटात झाली. सिद्धार्थ ताराचा क्रश असल्याबद्दलही बोलली. मात्र,आम्ही भेटलो त्या दिवसापासून लोक आमच्या केमिस्ट्रीबद्दल बोलू लागले, असेही तो म्हणाला. मात्र, आमच्यात तसं काही नव्हते.

शेरशाह' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ आणि कियाराची जवळीक वाढू लागली. दोघे एकमेकांसोबत बराच वेळ घालवातांना आणि अनेकदा एकत्र दिसले आहेत. सिद्धार्थ आणि कियारा यांनी लग्नाच्या बातमीवर अद्याप आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. आता सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाच्या तयारी जोरात सुरू झाली आहे. अशी माहिती समोर आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com