Sidharth Kiara Wedding: अंबानीची बातच न्यारी! मुकेश अंबानींनी सिद्धार्थ-कियाराला दिलेलं लग्नाचं गिफ्ट चर्चेत,काय आहे त्यात खास?

Sidharth Kiara Wedding
Sidharth Kiara WeddingEsakal

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी हे लव्हली कपल मंगळवारी 7 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले. दोघांनी राजस्थानातील जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये सात फेरे घेतले. लग्नानंतर लगेचच दोघेही दिल्लीला परतले. दरम्यान, त्यांच्या लग्नाचे अनेक फोटोही व्हायरल झाले आहेत.

त्यातच आता दोघांना लग्नात आलेल्या गिफ्टच्याही चर्चा रंगल्या आहे. करणने दोघांना तिन चित्रपटांसाठी साईन केल्याचं बोललं जात असतांनाच आता मुकेश अंबानी यांनी या जोडप्याला खास गिफ्ट दिल्याचं बोललं जात आहे.

Sidharth Kiara Wedding
Bigg Boss 16 Finale: 'राजा माणुस हा दिलदार', शिवचं बिग बॉसकडून तोंड भरुन कौतुक

सिड-कियाराला अंबानी कुटुंबाकडून मोठी भेट देण्यात आल्याचे वृत्त आहे. मुकेश अंबानी यांनी सिद्धार्थ आणि कियारा यांना रिलायन्स ट्रेंड्स फूटवेअरचे नवीन ब्रँड अॅम्बेसेडर बनवले आहे. रिलायन्स रिटेलच्या व्हेंचर ट्रेंड्स फूटवेअरने या जोडप्याला ब्रँड अॅम्बेसेडर बनवल्याची माहिती दिली आहे.

Sidharth Kiara Wedding
Bigg Boss 16: मनोरंजन अन् अ‍ॅक्शनचा तडका! फिनालेला स्पर्धकांवर पडणार 'बिजली'....

रिलायन्स रिटेल लिमिटेड कंपनीचे फॅशन आणि लाइफस्टाइलचे अध्यक्ष आणि सीईओ अखिलेश प्रसाद यांनी ही माहिती देतांना लिहिलयं की, 'कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​हे बॉलीवूडचे दोन सर्वात लोकप्रिय आणि प्रतिभावान युवा आयकॉन आहेत, त्यांचे खूप चाहते आहेत. त्यांना ब्रँड अॅम्बेसेडर बनवल्याने तरुणांसोबतचे आमचे नाते घट्ट होईल.'

Sidharth Kiara Wedding
Kiara-Sidharth Wedding Video: 'चुप माही चुप है रांझा, बोल कैसे वे ना जा!' शेरशाहच्या लग्नातला तो खास क्षण

अंबानी कुटुंबाकडून करोडोंच्या भेटवस्तू मिळाल्यानंतर सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी खूप खूश आहेत. वास्तविक कियारा अडवाणीचे अंबानी कुटुंबाशी चांगले संबंध आहेत. कियारा आणि मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी या बालपणीच्या मैत्रिणी आहेत. ईशा अंबानी पती आनंद पीरामलसोबत सिद्धार्थ कियाराच्या लग्नात पोहोचली होती. आता मुंबईत होणाऱ्या रिसेप्शनला अंबानी कुटुंबीय उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com