Mission Majnu: सिद्धार्थचा 'मिशन मजनू' पाकिस्तानात ट्रोल.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sidharth Malhotra Mission Majnu

Mission Majnu: सिद्धार्थचा 'मिशन मजनू' पाकिस्तानात ट्रोल..

Sidharth Malhotra Mission Majnu: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या 'मिशन मजनू' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. रश्मिका मंदान्ना यांचा चित्रपट 'मिशन मजनू' रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटाची चर्चा भारतापेक्षा जास्त तर शेजारील देश पाकिस्तानात होत आहे.

ट्रेलर रिलीज झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये या चित्रपटाला जोरदार ट्रोल केलं जातं आहे. आता पुन्हा एकदा मिशन मजनू आणि बॉलिवूडला पाकिस्तानातील एका पिझ्झा ब्रँडमुळं ट्रोल करण्यात येत आहे.

हेही वाचा: Harnaaz Sandhu: मिस युनिव्हर्स म्हणून हरनाजचा शेवटचा रॅम्प वॉक; मुकुट घालण्यासाठी पोहचली अन्...

चीजियस पाकिस्तान नावाच्या एका पिझ्झा ब्रॅण्डने 'मिशन मजनू'चं नाव न घेता त्याला ट्रोल केले आहे. कंपनीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर एक बर्गरचा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टची पाकिस्तानसह भारतातही चर्चा होत आहे.

या शेअर केलेल्या फोटोमध्ये बर्गरवर पांढरी टोपी घातली आहे आणि त्यावर "आदब सर, हा आइटम (पदार्थ) चीझियसमध्ये बनवला जात आहे," असंही लिहिले आहे.

हेही वाचा: Makar Sankranti 2023: मराठी कलाकारांनी दिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा...

ही पोस्ट शेअर करत Cheeseous Pakistan ने Insta वर लिहिलयं, “तुमच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी ही छोटीशी गोष्ट, जी ट्रेंडिंग मीमशी संबंधित आहे. हलक्या फुलक्या अंदाजात घ्या… कोणतीही धार्मिक किंवा विश्वास प्रणालीवर आधारित नाही”

चिझी पाकिस्तानच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स केल्या जात आहेत. या पोस्टवर लोक मिशन मजनू या चित्रपटाला प्रचंड ट्रोल करत आहेत.

या पोस्टवर यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं लिहिलयं "मिशन बर्गर"  एकाने लिहिले, "मिस्टर तावीज कुठे आहे?" त्याच्या पोस्टमध्ये चीझी पाकिस्तानने हॅशटॅगमध्ये मिशन मजनू आणि नेटफ्लिक्सचाही समावेश केला आहे.

हेही वाचा: Urfi Javed: उर्फी काही नमेना! पोलिस स्टेशनमधून आल्यावर नवीन फॅशनचा अविष्कार

वास्तविक 'मिशन मजनू' हा एक स्पाय थ्रिलर आहे. ज्यामध्ये सिद्धार्थची व्यक्तिरेखा एका रॉ एजंटची आहे. जोपाकिस्तानातील बेकायदेशीर अणुबॉम्ब निर्मितीचं काम अयशस्वी करण्याच्या मोहिमेवर निघतो.

हेही वाचा: Rakhi Sawant: असा कसा रे तु आदिल! रडून रडून राखीची अवस्था वाईट

त्यातच सिद्धार्थच पात्र रश्मिका मंदानाने साकारलेल्या पाकिस्तानी महिलेशी लग्न करते. सिद्धार्थ मल्होत्राच्या 'मिशन मजनू'चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर पाकिस्तानमधील लोकांनी त्याला टोपी, सूरमा घातलेल्या मुस्लिम व्यक्तीसाठी आदाब आणि जनाब असे शब्द वापरल्याबद्दल आक्षेप घेतला.