HBD Arijit Singh| घटस्फोटानंतर का होईना अरिजीतला शेवटी त्याचं खरं प्रेम मिळालं,कोण आहे ती मुलगी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

know about Arijit Singh's Love Story

HBD Arijit Singh: घटस्फोटानंतर का होईना अरिजीतला शेवटी त्याचं खरं प्रेम मिळालं,कोण आहे ती मुलगी?

स्वत:च्या गाण्यांनी श्रोत्यांना रडायला ,हसायला आणि प्रेमात पडायला भाग पाडणारा अरिजीत सिंह त्याच्या चाहत्यांचा आवडता आहे.अरिजीतचे कोणते नवे गाणे येणार,कधी येणार याची वेळोवेळी चाहते माहिती घेत असतात.गाण्यांचा विषय बाजूला ठेवला तर अरिजीत त्याच्या वयक्तिक जीवनातल्या गोष्टी सहसा बाहेर पडू देत नाही.आज अरिजीतचा बर्थडे.तुम्हाला या बड्डे बॉयच्या लव स्टोरी बद्दल माहितीये काय? (Arijit Singh's Love Story)

अरिजीत सिंह मुर्शिदाबादमधील जीयागंजचा आहे.लहानपणी त्याच्या शेजारी त्याची एक मैत्रीण राहत होती.लहानपणीपासूनच अरिजीतला ही मुलगी आवडायची.काहीच दिवसात या दोघांची मैत्री प्रेमात बदलली.त्यावेळी अरिजीत सामान्य माणूस होता.'फेम गुरूकुल' या शो पासून अरिजीतने त्याच्या सिंगींग करियरला सुरूवात केली होती.(Arijit Singh)शो साठी अरिजीत जीयागंज मधून जेव्हा बाहेर पडला तेव्हा त्याची ही प्रेमिका तो यशस्वी होऊन आल्यावर माझ्याशी लग्न करेल या आशेत जीयागंजमधे त्याची वाट बघत बसली होती.मात्र शो दरम्यान तीथल्याच एका कंटेस्टंटशी त्याची जवळीक झाली.तीचे नाव होते रुपरेखा बॅनर्जी.शो नंतर या दोघांनी कोर्टात लग्न केले.मात्र या दोघांचे लग्न काही फार काळ टिकले नाही.या दोघांनाही जेव्हा लक्षात आले या दोघांचे मार्ग वेगळे आहेत तेव्हा रुपरेखा आणि अरिजीतने वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा: Singer vaishali made kill her Death Threat : वैशाली माडेचा हत्येचा कट रचल्याचं वैशालीने सांगितलं

म्हणतात ना 'जोडी उपरसेही बनके आती है'.उशिरा का होईना अरिजीतच्या ते बालपणीचं प्रेम त्याला आठवलं.त्या मुलीचं नाव होतं 'कोयल रॉय'.अरिजीतला तीची आठवण येईपर्यंत तीचेही लग्न होऊन तीचा घटस्फोट झाला होता.एकदा ते दोघे समुद्रकिनारी बसले असताना जुन्या गोष्टी आठवत होते.त्यावेळी अरिजीतने 'तुम ही हो' हे रोमँटिक गाणं म्हणत कोयलला प्रपोज केले.कोयलला तीच्या पहिल्या नवऱ्यापासून एक मुलगी आहे.२०१४ मधे अरिजीत आणि कोयलने त्यांचा परिवार आणि मित्रमंडळाच्या साक्षीने लग्न केले.आज दोघेही आनंदाने सोबत राहत आहेत.

Web Title: Singer Arijit Singh Finaaly Marry To Her Childhood Friend Koyal Roy After

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top