Benny Dayal Video: लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान प्रसिद्ध गायक गंभीर जखमी! डोक्याला आणि बोटांना दुखापत

Benny Dayal Video:
Benny Dayal Video:Esakal

प्रसिद्ध गायक बेनी दयाल याचा चाहता वर्ग तगडा आहे. त्याचे लाखो फॉलोवर्सही आहेत. त्यांच्या अप्रतिम आणि अनोख्या गाण्यांसाठी तो नेहमीच चर्चेत असतात. त्याच्या चाहत्यांना त्याचे गाणे ऐकायला आवडतात. मात्र नुकतच बेनी दयाल यांच्यासोबत एक मोठी दुर्घटना घडली, यामध्ये त्यांना गंभीर दुखापतही झाली आहे.

Benny Dayal Video:
Piyush Mishra: 'सातवीत असतांना 'त्या' महिलेनं माझं लैंगिक शोषण केलं', अभिनेत्यानं शेअर केला धक्कदायक अनुभव

अलीकडेच, बेनी दयाल चेन्नईच्या वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये त्यांचा लाइव्ह कॉन्सर्ट करत होता, या दरम्यान शुटिंग करत असलेला ड्रोन त्याला येवुन धडकला, ज्यामुळे त्याच्या डोक्याला आणि बोटांना गंभीर दुखापत झाली.

Benny Dayal Video:
Oscars 2023मध्ये फक्त RRRचीच हवा! आलिया भट्ट आणि 'या' सुपरस्टारला मिळाला हॉलीवुड 'स्पॉटलाइट अवॉर्ड'

त्याला तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले, त्यानंतर या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अपघाताच्या व्हिडिओमध्ये, बेनी दयाल स्टेजवर आपला धमाकेदार परफॉर्मन्स देताना भान विसलेला दिसतो. दरम्यान, त्याच्या डोक्याच्या काही इंच वर, हाय-स्पीड ड्रोन जातो, जो त्या म्यूजिक कॉन्सर्टची चित्रे आणि व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो.

ड्रोन ऑपरेटर ड्रोनला बेनी दयालच्या जवळ आणतो मात्र त्यामुळ बेनी दयाल यांच्या डोक्याला आणि बोटांच्या मागील बाजूस मार लागला. ड्रोनशी टक्कर झाल्यानंतर बेनी दयाल वेदनेने आक्रोश करत मंचावर खाली बसलेला दिसतो.

Benny Dayal Video:
Tiger 3: भाग टायगर भाग! आता Tiger ला वाचवण्यासाठी 'पठाण' येणार..

त्याचबरोबर गायक बेनी दयाल यांनेही या घटनेची माहिती दिली. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून त्याच्या चाहत्यांना या घटनेची माहिती दिली. यावेळी तो म्हणाला, 'लाइव्ह स्टेज परफॉर्मन्सदरम्यान ड्रोन चुकून माझ्या डोक्याला लागला आणि माझ्या बोटांनाही काही जखमा झाल्या आहेत. माझं डोक्यालाही दुखापत झाली आहे. माझ्या दोन बोटांनाही गंभीर दुखापत झाली. पण आता मी ठीक आहे. मला वाटतं की मी यातून खूप वेगानं बरा होणार आहे. प्रेम आणि प्रार्थनांसाठी सर्वांचे आभार.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com