Piyush Mishra: 'सातवीत असतांना 'त्या' महिलेनं माझं लैंगिक शोषण केलं', अभिनेत्यानं शेअर केला धक्कदायक अनुभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Piyush Mishra

Piyush Mishra: 'सातवीत असतांना 'त्या' महिलेनं माझं लैंगिक शोषण केलं', अभिनेत्यानं शेअर केला धक्कदायक अनुभव

बॉलिवूडचा बहुप्रतिभावान अभिनेता पियुष मिश्रा हा एक प्रसिद्ध गायक आणि लेखकही आहे. बेधडक, मस्त स्वभावाचा पियुष मिश्रा यांचे गाणे लोकांच्या ओठावर असतात. त्याच्या व्हिडिओमुळेही तो चर्चेत असतो. मात्र आज तो काही वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आला आहे. खरं तर अभिनेत्याने त्याच्या आयुष्याविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

'तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा' या आपल्या आत्मचरित्रात अभिनेत्याने त्याच्या बालपणातील काही वेदनादायक अनुभवाचा उल्लेख केला आहे. या कटू अनुभवाच्या वेदना आजही कुठेतरी त्याच्या मनात आहे.

पियुष मिश्राने लहानपणी एका दूरच्या महिला नातेवाईकाने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. तेव्हा पियुष मिश्रा सातवीत शिकत होता. ही गोष्ट सुमारे 50 वर्षे जुनी आहे. याघटनेबद्दल बोलतांना पियुष मिश्रा म्हणतो की, या घटनेने तो खुपच हादरला होता. त्याच्या मनात तो प्रसंग असा घर करुन बसला की त्यापासून त्याला बाहेर पडण्यासाठी कित्येक वर्ष लागली. इतकच नाही तर बऱ्याच काळ त्याला सेक्सची भीती वाटत होती.

पियुष मिश्रा यांनी वृत्तसंस्था पीटीआयशीही त्यांच्यासोबत घडलेल्या या घटनेबाबत संवाद साधला आहे. यावेळी तो म्हणतो, 'सुमारे 50 वर्ष जूनी गोष्ट आहे. मी ७वी मध्ये शिकत होतो. उन्हाळ्याचे दिवस होते. मी पुस्तकात फक्त सत्य लिहिले आहे, पण मला कोणासोबतही बदला घ्यायचा नाही आहे म्हणून मी लोकांची नावे बदलली आहेत. त्या घटनेने मला खूप धक्का बसला. जे काही घडलं त्याचे मला आश्चर्य वाटले.

पुढे पियूष मिश्रा म्हणाले की, 'सेक्स ही एक आरोग्यदायी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच याचा अनुभव घेता त्यावेळी ते चांगले असावे नाहीतर आयुष्यभर तुम्हाला त्याची भिती वाटते. त्या लैंगिक अत्याचाराने मला आयुष्यभर पछाडले. खूप वेळ लागला आणि अनेक सोबतीनंतर मी त्या भीतीतून आणि गुंतागुंतीतून बाहेर पडू शकलो.'

या पुस्तकातून पियुषने त्याचा प्रवास शेअर केला आहे . ग्वाल्हेरचे रस्ते सोडून तो दिल्लीच्या मंडी हाऊसपर्यंत कसा पोहोचला आणि मग तेथून मुंबईपर्यंतचा प्रवास कसा झाला? पुस्तकात त्यांचे नाव संताप त्रिवेदी किंवा हॅम्लेट आहे. कारण एनएसडीमध्ये ते या नावाने ओळखले जात होते.