
प्रसिद्ध गायक 'KK' पंचतत्त्वात विलीन,भावूक वातावरणात अखेरचा निरोप
आपल्या शेकडो गाण्यांनी लोकांचं मन जिंकणारा बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक(Bollywood famous Singer) केके(KK) पंचतत्वात विलीन झाला आहे. कोलकाता मध्ये निधन झाल्यावर आज २ जून,२०२२ रोजी मुंबईतील वर्सोवा स्मशानभूमीत केके वर अंतिम संस्कार(Funeral) करण्यात आले. त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलीवूड मधील अनेक सेलिब्रिटी देखील यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा: कोलकाता इथं kk ची हत्या? का होतेय CBI चौकशीची मागणी? नंदिता पुरी नाव चर्चेत
कृष्णकुमार कुन्नथ उर्फ केके ला त्याच्या वडिलांनी अग्नी दिला. यावेळी आपल्या लाडक्या गायकाला अखेरचा निरोप देण्यासाठी चाहत्यांची देखील झुंबड उडाली होती. हजारो चाहते केकेचं अंतिम दर्शन घ्यायला पोहोचले होते. चाहत्यांनी केकेला अंतिम निरोप देताना 'केके अमर रहो' या घोषणाही दिल्या. या व्यतिरिक्त म्युझिक इंडस्ट्रीतील काही दिग्गज देखील वर्सोवा स्मशान भूमीत पोहोचले होते ते आपल्या लाडक्या मित्राला कायमचं 'अलविदा' म्हणायला. सगळंच वातावरण भावूक झालं होतं.
हेही वाचा: 'सरसेनापती हंबीरराव' पाहून राज ठाकरे चक्क २ तास...',तरडेंनी सांगितला किस्सा
केक कोलकाता मधील गुरुदास कॉलेजच्या नजरुल मंचावर आयोजित कॉन्सर्ट दरम्यान लाइव्ह परफॉर्म करत होता. त्या दरम्यान त्यानं कितीतरी वेळेला गरम होत असल्याची तक्रार केली होती. कॉन्सर्ट नंतर केकेची हॉटेलवर पोहचल्यावर तब्येत अचानक बिघडली. त्याला हॉस्पिटलला नेलं गेलं. पण तिथे नेता नेता वाटेतच त्याचा मृत्यू झाला . त्याच्या मृत्यूनंतर आता अनेक गोष्टींचा नव्यानं खुलासा होत आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यावर हे स्पष्ट झालं की केके चा मृत्यू हार्ट अटॅकनं झाला,त्यानंतर विमानानं त्याचं पार्थिव मुंबईला आणलं गेलं.
हेही वाचा: अनन्या पांडेनं केलाय सेक्सिझमचा सामना; म्हणाली,'माझ्या स्तनांवरही लोक...'
आज २जून,२०२२ रोजी एक-दीडच्या सुमारास त्याच्या चाहत्यांच्या आणि बॉलीवूड सेलिब्रिटी, नातेवाईकांच्या उपस्थितीत केकेला अखेरचा निरोप देण्यात आला. अंत्यसंस्काराआधी काही वेळ त्याचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं होतं. आज तो क्षण अनुभवताना प्रत्येकाच्या मनात केके नं गायलेलं 'तडप,तडप' के गाणं मात्र खरी 'तडप' अनुभवण्यास देत होतं. आपलं आवडतं माणूस दूर जाण्याची ही अशी तडपही आज अनेकांनी अनुभवली.
Web Title: Singer Kk Passes Away Funeral
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..