'मम्मा, मला सासरी मरायचं नाही'; चिठ्ठी लिहून गायिकेची आत्महत्या

वृत्तसंस्था
Tuesday, 18 February 2020

एक गायिका या निष्ठुर अशा हुंडा मागणीचा बळी ठरली आहे. सासू-सासरे व नवरा हुंड्यासाठी त्रास देतात म्हणून गायिकेने आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. 

बंगळूर : महिलांना सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी त्रास दिल्याने आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. पुढारलेल्या आणि सुशिक्षित समाजातही हा प्रकार सर्रास घडताना दिसतो. अशातच एक गायिका या निष्ठुर अशा हुंडा मागणीचा बळी ठरली आहे. सासू-सासरे व नवरा हुंड्यासाठी त्रास देतात म्हणून गायिकेने आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. 

कादंबरीतून उलगडलं कोरोनाचं हे धक्कादायक रहस्य!

कर्नाटकातील २६ वर्षीय सुश्मीता या गायिकेने सोमवारी (ता. १७) आपल्या आईच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. सासरच्या लोकांची हुंड्यासाठी अधिक मागणी होती, त्यामुळे ते सुश्मिताला नेहमी त्रास देत होते. याच त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे समजते. अन्नपूर्णेश्वरी येथे घडलेल्या या दुर्दैवी प्रकारामुळे सुश्मिताच्या सासरकडच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तिचा नवरा बेपत्ता असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुसाईड नोटमध्ये काय म्हणलंय?
सुश्मिताने आत्महत्या करण्यापूर्वी सर्व गोष्टी चिठ्ठीत लिहून ठेवल्या होत्या. तिच्या आईला चिठ्ठी मिळाल्यानंतर हा सर्व प्रकरणाचा उलगाडा झाला. तिने चिठ्ठीत लिहिलं आहे की, 'आई मला माझ्या या चूकीसाठी माफ कर. शरद (नवरा) मला त्याच्या आईच्या -गीताच्या सांगण्यावरून सतत त्रास देतो. मी माझ्या चुकीची सजा भोगतीय. शरद, गीता आणि वैदेही हे माझ्या मृत्यूसाठी कारणीभूत आहेत. मला आत्महत्येचे पाऊल उचलावे लागले यासाठी त्यांना शिक्षा व्हायला हवी. शरदने माझं कधीच ऐकून घेतलं नाही. मला माझ्या सासरी मरायचं नाही. त्यामुळे मी आपल्या घरी आत्महत्या करत आहे. माझे अंत्यसंस्कार माझा भाऊ सचिनला करायला सांग. माझ्यासाटी वाईट वाटून घेऊ नको. सचिन तुझ्यासोबत आहे.' असे तिने सुसाईड नोटमध्ये म्हणले आहे. 

माधुरी दीक्षितच्या पहिल्या हिरोचे निधन

सुश्मिताचे २०१८ मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या शरदशी लग्न झाले होते. तेव्हापासूनच तो तिला हुंड्यासाठी त्रास देत होता. तिच्या जाण्याने तिचे मित्र-मैत्रिणी, कलाविश्व हळहळले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Singer Sushmita commits suicide due to domestic violence in banglore