गर्लफ्रेंड म्हणाली, राक्षसी कृत्यं केलं; स्लमडॉगच्या अभिनेत्यानं केलं लैंगिक शोषण

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 24 February 2021

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मधुरवर आता खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई - प्रसिध्द चित्रपट स्लमडॉग मिलेनिअरचा अभिनेता मधुर मित्तल याच्यावर त्याच्या पूर्वीच्या गर्लफ्रेंडनं लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. ती एवढ्यावरच थांबलेली नाही तर मधुरनं आपल्याला मारहाण केल्याचं तिनं म्हटलं आहे. या घटनेची दखल घेऊन मुंबईतील खार पोलीस स्टेशनंमध्ये मधुरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 फेब्रुवारी रोजी ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मधुरवर आता खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर मारहाण करणे, लैंगिक शोषण, असे आरोप करण्यात आले आहे. फिर्यादीनं सांगितल्यानुसार मधुर 2020 मध्ये तिला भेटला होता. त्यानंतर दिवसानं तो दारुच्या नशेत असताना तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.

पीडितेच्या वकिलांना असे म्हटले आहे की, तिनं मधुरशी केव्हाच संबंध तोडले होते. त्यामुळे तो फार रागात होता. तो कोणाचे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अशावेळी तो रागाच्या भरात पीडितेच्या रुममध्ये गेला. आणि त्यानं तिथे तिच्या सोबत गैरवर्तन केलं. याशिवाय मधुरनं पीडितेचा गळा पकडला, तिच्या कानशीलात लगावली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर डोळ्यांवरही त्यानं मारहाण केली आहे. फिर्यादीत याला शोषण असे म्हटले आहे.

'भीक नको रे, मला दोन वेळची भाकरी हवी आहे'

रजनीकांतचा जावई आहे, थाट तर असणारच

मधुरनं केलेल्या मारहाणीमध्ये पीडितेचा चेहरा, मान, हात आणि पाठीला दुखापत झाली आहे. याप्रकरणी तपास करणा-या पोलीस अधिका-यांनी सांगितले की, मधुर मित्तलच्या विरोधात  छेडछाड. लैंगिक शोषण, यासाठी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासाठी त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला गेला आहे. याविषयावर मधुर मित्तलकडून कुठलीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Slumdog millionaire actor Madhur Mittal booked for sexual assault by mumbai khar police