
मुंबई ः आता सगळ्यांना वेध लागले आहेत गणेशोत्सवाचे. मात्र कोरोनाच्या संकटकाळात यंदाच्या गणेशोत्सवावर सरकारने काही बंधने घातलेली आहेत. सरकारच्या नियमावलीनुसारच गणेशोत्सव साजरा करायचा आहे. त्यामुळे अशा वेळी छोट्या पडद्याने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे आणि ते म्हणजे घरपोच गणपतीबाप्पा पोहोचवण्याचे. हा उपक्रम स्टार प्रवाह ही वाहिनी राबविणार आहे.
स्टार प्रवाह या वाहिनीवर विविध मालिका सुरू आहेत आणि त्या मालिकांसाठी विविध कामगार आणि तंत्रज्ञ काम करीत असतात. त्यांच्या घरी गणपती बाप्पांना पोहोचविण्याचे काम स्टार प्रवाह वाहिनी करणार आहे. या वाहिनीने एका एजन्सीची नियुक्ती केली आहे आणि त्या एजन्सीची माणसे तंत्रज्ञ आणि कामगार यांच्या घरी गणपती पोहोचविणार आहेत. स्टार प्रवाहच्या मालिकांकरिताच हा उपक्रम आहे. कोरोनाच्या काळात ही आरोग्याच्या दृष्टीने ही अनोखी शक्कल लढविण्यात आली आहे. यामुळे सरकारी नियमांचे योग्य असे पालन तर होईलच आणि कामगार व तंत्रज्ञांना बाहेर न पडता घरीच बाप्पाची मूर्ती मिळेल.
--------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.