Smita Jaykar: त्यांना माझा खूप राग येतो कारण.. स्मिता जयकर यांच्याविषयी मिलिंद गवळींची खास पोस्ट चर्चेत

अभिनेता मिलिंद गवळी यांनी स्मिता जयकर यांच्याविषयी खास पोस्ट लिहिली आहे.
smita jaykar book launch autobiography post shared by milind gawali by aai kuthe kay karte
smita jaykar book launch autobiography post shared by milind gawali by aai kuthe kay karte SAKAL
Updated on

Smita Jaykar Book Launch Milind Gawali Post News: देवदास, हम दिल दे चुके सनम अशा हिंदी सिनेमांमधून आणि अनेक मराठी सिनेमांमधून काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर.

स्मिता यांचं आत्मचरित्र मी स्मिता जयकर वाचकांच्या भेटीला आलंय. त्यानिमित्ताने आई कुठे काय करते फेम अभिनेता मिलिंद गवळी यांनी स्मिता जयकर यांच्याविषयी खास पोस्ट लिहिली आहे.

(smita jaykar book launch autobiography post shared by milind gawali by aai kuthe kay karte)

smita jaykar book launch autobiography post shared by milind gawali by aai kuthe kay karte
Rajpal Yadav: मुलगी जन्मली आणि बायकोने जग सोडलं.. राजपाल यादवची दर्दभरी कहाणी

मिलिंद गवळी लिहितात.. " मी स्मिता जयकर " या पुस्तकाचा नुकताच प्रकाशन सोहळा पुण्यामध्ये पार पडला. त्या सुंदरशा कार्यक्रमाला माझा उपस्थित राहण्याचा योग आला.

"देवकी" नावाच्या चित्रपटांमध्ये स्मिताजींनी पाहुणा कलाकार म्हणून काम केलं होतं, त्या शूटिंगच्या दरम्यान आमची नुसती ओळख झाली.

पण आमच्या दोघांचीही जवळची मैत्रीण अर्चना नेवरेकर, हिच्या मुळे संस्कृती कला दर्पणाच्या नाटकांच्या परीक्षणासाठी आमच्या खूप वेळा भेटीगाठी झाल्या,

मिलिंद गवळी लिहितात.. " मी स्मिता जयकर " या पुस्तकाचा नुकताच प्रकाशन सोहळा पुण्यामध्ये पार पडला. त्या सुंदरशा कार्यक्रमाला माझा उपस्थित राहण्याचा योग आला.

"देवकी" नावाच्या चित्रपटांमध्ये स्मिताजींनी पाहुणा कलाकार म्हणून काम केलं होतं, त्या शूटिंगच्या दरम्यान आमची नुसती ओळख झाली.

पण आमच्या दोघांचीही जवळची मैत्रीण अर्चना नेवरेकर, हिच्या मुळे संस्कृती कला दर्पणाच्या नाटकांच्या परीक्षणासाठी आमच्या खूप वेळा भेटीगाठी झाल्या,

smita jaykar book launch autobiography post shared by milind gawali by aai kuthe kay karte
Suraj Kumar: उजवा पाय गमावला! प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचा भीषण अपघात

मिलिंद गवळी पुढे लिहितात.. असंख्य नाटकं आणि सिनेमे आम्ही एकत्र परीक्षक म्हणून बघितले, अतिशय सुंदरशा नाटकांचा छानसा अनुभव, आम्ही एकत्र घेतला.

योग्य व्यक्तींना, योग्य नाटकाला, योग्य सिनेमाला बक्षीस देण्यासाठी आम्ही हट्ट ही धरला. आणि त्या प्रवासात आमचा फक्त परिचय नाही राहिला तर आमची छानशी निखळ मैत्री झाली.

मिलिंद पुढे लिहितात.. स्मिताजींची एक सवय आहे, कुठलीही गोष्ट करायची तर ती मन लावूनच करायची किंवा मनापासूनच करायची, मग तो अभिनय क्षेत्र असो किंवा आध्यात्म असो,

कुटुंबासाठी वेळ देणं असो किंवा मित्र-मैत्रिणीं बरोबर वेळ घालवणं असो, सगळ्यांमध्ये त्या खूप मनापासून involve असतात.

माझी "आई कुठे काय करते" ही मालिका त्यांनी मधूनच लॉकडाऊन च्या दरम्यान बघायला सुरुवात केली, त्यांना ती इतकी भावली की त्यांनी आधीचे सगळे एपिसोड सलग बघून टाकले

smita jaykar book launch autobiography post shared by milind gawali by aai kuthe kay karte
Shahu Maharaj Jayanti: महाराज, जात पाहून नोकऱ्या देता, किरण मानेंची शाहू महाराजांविषयी पोस्ट एकदा वाचाच

स्मिता पुढे लिहितात... आणि मी जो अनिरुद्ध देशमुख हे कॅरेक्टर करतोय त्याचा त्यांना मनापासून राग येतो, आणि ते सातत्याने गेली दोन वर्ष, तो राग व्यक्त करत असतात,

आणि गमतीची गोष्ट अशी आहे की त्या अनिरुद्ध देशमुखच्या रागामध्ये त्यांचं मिलिंद गवळी बद्दलच कौतुक सतत मला जाणवत असते.

खळखळून हसणं किंवा हृदयापासून हसणं हे फक्त स्मिताजींकडूनच शिकावं, आणि आयुष्य कसं जगावं हे स्मिताजींना कळलेलं आहे, अभिनेत्री म्हणून त्यांनी खूप काम केलंय, खूप उंची गाठली आहे, पण त्याच्यापेक्षा कित्येक पटीने त्यांनी अध्यात्मची उंची गाठलेली आहे,

मिलिंद शेवटी लिहितात.. मी त्यांना " Divine "म्हणतो, कारण त्या आहेतच परमेश्वराच्या अगदी जवळच्या किंवा परमेश्वराच्या लाडक्या, माझी खात्री आहे की परमेश्वर तर त्यांच्याशी नक्की बोलत असणार, त्यांच्याशी संवाद साधत असणार,

कधी योग आला तर त्त्यांची दुर्गापूजा अनुभवायला हवी, साक्षात पृथ्वीतलावर दुर्गा अवतरते, आणि त्यांच्या स्वतः मध्ये सुद्धा दुर्गा माता आहे असं मला वाटतं, त्या कधीही आजूबाजूला असल्या, कुठल्या कार्यक्रमाला आल्या, तर संपूर्ण वातावरणच चैतन्यमय होऊन जातं.

आयुष्यातले खूपशे शिखर त्यांनी पार केलेले आहेत. त्यात आता एक लेखिका म्हणून त्यांची जी सुरुवात झाली आहे त्याला माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. अशाप्रकारे मिलिंद गवळींनी स्मिता जयकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com