Sonam Kapoor: कुर्रर्र...! सोनमच्या बाळाचं नाव ठरलं, आजोबा नातवाला...

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि लोकप्रिय कलाकार अनिल कपूर यांची मुलगी असणाऱ्या सोनम कपूर ही काही दिवसांपूर्वी बाळंत झाली. तिनं मुलाला जन्म दिला आहे.
Sonam Kapoor
Sonam Kapooresakal

Sonam Kapoor: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि लोकप्रिय कलाकार अनिल कपूर यांची मुलगी असणाऱ्या सोनम कपूर ही काही दिवसांपूर्वी बाळंत झाली. तिनं मुलाला जन्म दिला आहे. आपण आजोबा झाल्याचा ग्रँड आनंदोत्सव साजरा केला (Bollywood Actress) होता. त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. नेटकऱ्यांनी देखील सोनम आणि अनिल कपूर यांना शुभेच्छा देत त्यांचे कौतूक (Anil Kapoor News) केले होते. आता सोनमच्या बाळाचा नामकरण विधी पार पडला आहे. त्याचे टोपणनाव ठेवण्यात आले आहे. आता आजोबा आपल्या नातवाला कोणत्या नावानं हाक मारणार याविषयी चाहत्यांना उत्सुकता होती. रिया कपूरनं सोनम - आनंदच्या बाळाच्या नामकरण विधीचा व्हिडिओ व्हायरल केला आहे.

रियानं वेलकम सेरेमनी ही सोशल मीडियावर शेयर केली असून त्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसादही मिळाला आहे. तिनं इंस्टावरुन ती स्टोरी शेयर केली आहे. तीन दिवसांपूर्वी सोनम ही तिच्या माहेरी आली आहे. त्यानिमित्तानं अनिल कपूर यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला होता. यावेळी कपूर कुटूंबियातील सर्वांनी ईश्वराचे धन्यवाद मानुन प्रार्थनाही केली. याच वेळी त्याचं नावही ठेवण्यात आहे. सध्या तरी आजोबा अनिल कपूर आपल्या नातवाला सिंबा नावानं हाक मारणार आहेत.

Sonam Kapoor
Liger: आतापर्यतचा सर्वात बोगस चित्रपट 'लायगर', IMDb कडून 1.71 रेटिंग!

इंस्टावर शेयर केलेल्या स्टोरीमध्ये सोनमचं घर हे रंगीबेरंगी फुग्यांनी सजवलं गेलं आहे. घराच्या बाहेर वेलकम होम असे पोस्टर्स लावण्यात आले आहे. त्या बॅनरवर बेबी कपूर आहुजा असे लिहिण्यात आले आहे. यावेळी वेलकम होम सिंबा असे म्हणून त्याचे स्वागत करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी सोनमनं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आई झाल्यानंतर आपल्या प्राथमिकतेमध्ये फरक पडत असल्याचे म्हटले आहे. माझ्या मुलानं काही या जगात येण्याचा निर्णय घेतला नाही तर तो आमचा निर्णय आहे. अशी प्रतिक्रिया सोनमनं दिली होती. बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी सोनमचं कौतूक करत तिला आणि तिच्या लिटल सिंबाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Sonam Kapoor
Liger Movie: 'जास्त चरबी चढलीय का?' थिएटरचालक विजयवर संतापले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com