अजय देवगण आणि किच्चा सुदीप यांच्यात राष्ट्रभाषेवरुन वाद.. म्हणाले, हिंदी..

हिंदी ही राष्ट्रभाषा आहे की नाही हा वाद बराच जुना आहे. या वादात आता अभिनेता अजय देवगण आणि किच्चा सुदीप यांनीही उडी घेतली आहे.
ajay devgan vs kichcha suddep
ajay devgan vs kichcha suddepsakal

आपली राष्ट्रभाषा कोणती हा वाद अद्याप मिटलेला नाही. भारतात हिंदी ही भाषा बहुतांशी राज्यातील लोकांना समजते म्हणून हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे काहींचे म्हणणे आहे परंतु दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारण्यास विरोध होत आहे. हा भाषिक वाद बराच जुना आहे. परंतु या वादात आता कलाकारांनीही उडी घेतली आहे. कन्नड अभिनेता किच्चा सुदीप आणि बॉलीवूड स्टार अजय देवगण यांच्यात हिंदी ही राष्ट्रभाषा आहे की नाही यावरून ट्विटर युद्ध रंगले आहे. (twit war between ajay devgan and kichcha sudeep)

ajay devgan vs kichcha suddep
प्रियंका चोप्राही 'चंद्रमुखी'च्या प्रेमात.. आदिनाथ, अमृताला दिल्या खास शुभेच्छा..

अभिनेता सुदीपने (kichcha sudeep) एका चित्रपटाच्या प्रोमोशन दरम्यान 'हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही. बॉलीवूड मधील कित्येक चित्रपट तेलगू आणि तामिळ चित्रपटामधून प्रेरित होऊन केले जातात' असे विधान केले होते. हे विधान अजय देवगण याला चांगलेच खटकले. “माझ्या भावा, तुमच्या मते हिंदी ही राष्ट्रभाषा नसेल तर मग तुम्ही तुमचे चित्रपट हिंदीत डब करून का प्रदर्शित करता? हिंदी ही आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा होती, आहे आणि राहील. जन गण मन.” असे ट्विट यावर अजयने केले. या ट्विटमध्ये त्याने सुदीपलाही टॅग केले होते.

ajay devgan vs kichcha suddep
भारती सिंगला 'चंद्रमुखी'ची भुरळ.. म्हणाली, 'बाई गं..'

बुधवारी संध्याकाळी ट्विटर वर Twitter हे युद्ध रंगले. अजयच्या (ajay devgan) त्या ट्विटवर सुदीपनेही उत्तर दिले. 'अजय देवगण सर, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला. माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचला. पण मला जे म्हणायचं आहे ते कदाचित मी तुम्हाला भेटून अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकेल. मला कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता किंवा कोणत्याही वादाला सुरुवात करायची नव्हती. मी तसं का करेन सर..' असे ट्विट सुदीपने अजयला उद्देशून केले आहे.

'सर, मी आपल्या देशाच्या प्रत्येक भाषेवर प्रेम आणि आदर करतो. हा विषय इथेच थांबावा अशी माझी इच्छा आहे. कारण माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला. तुम्हाला नेहमी खूप प्रेम आणि शुभेच्छा. लवकरच भेटूया..' असेही सुदीपने म्हंटले आहे. पुढे तो म्हणतो, 'सर, तुम्ही हिंदीत पाठवलेला मजकूर मला समजला. कारण आम्ही सर्व हिंदीचा आदर करतो, प्रेम करतो आणि ती शिकण्याचा प्रयन्त करतो. हरकत नाही सर. पण मी जर कन्नड भाषेत बोललो असतो तर काय झाले असते असा सहज विचार मनात येऊन गेला. आम्हीही याच भारताचा भाग आहोत नाहीका,' असे ट्विट सुदीपने केले आहे.

तर अजयनेही यावर व्यक्त होणे पसंत केले आहे,“तू माझा मित्रआहेस. आपल्यातील गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद. मी नेहमीच चित्रपटसृष्टी एक आहे असा विचार करतो. आम्ही सर्व भाषांचा आदर करतो आणि प्रत्येकाने आमच्या भाषेचाही आदर करावा अशी आमची अपेक्षा आहे. कदाचित, भाषांतरात समजून घेण्यात चूक झाली असावी.”असे उत्तर अजयने दिले आहे.

तर सुदीपने या संवादाला शेवट मार्मिकपणे केला आहे. 'भाषांतरामुळे एखादी गोष्ट चुकीची समजली जाते. त्यामुळेच संपूर्ण प्रकरण जाणून घेणे गरजेचे आहे. मी तुम्हाला दोष देत नाही. कारण एका चांगल्या विषयावर संवाद साधण्यासाठी तुम्ही मला ट्विट केले याचा आनंद अधिक आहे. असे सुदीप म्हणतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com