Ask Sonu Sood: 'लोक तर तुला देव म्हणताय', चाहत्याचा प्रश्न, सोनुच्या उत्तराने जिंकल मन

Ask Sonu Sood
Ask Sonu SoodEsakal

Ask Sonu Sood: अभिनेता सोनू सूदने साऊथ फिल्म इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सोनूने आजवर विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. सोनू सूद हा एक अभिनेताच नव्हे तर सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही लोकप्रिय आहे.

सोनू सूद आज लोकांसाठी मसिहा बनला आहे. कोरोनाच्या काळातच नव्हे तर आजही सोनू सर्वाच्या मदतीला धावतो. गरजूंची मदत करण्यासाठी कायम तत्पर असतो. याच कारणामुळे त्याचे चाहते त्याला देव म्हणतात.

Ask Sonu Sood
Devraj Patel : भाई दिल से बुरा लगा है! प्रसिद्ध युट्युबर देवराज पटेलचा मृत्यू; काय घडलंय वाचा

दरम्यान जेव्हा सोनूला त्याचे चाहते देव म्हणतात तेव्हा त्याची प्रतिक्रिया कशी असते यावर सोनु सूदने उत्तर दिले आहे.

सोनूने त्याच्या सोशल मिडियावर आस्क मी एनीथिंग हे सत्र सुरु केले होते. ट्विटरवरील याच आस्क मी एनीथिंग सत्रादरम्यान त्याला त्याच्याच एका चाहत्याने त्याला विचारले की, "सोनू सर लोक तुम्हाला देव म्हणतात, याबद्दल 2 शब्द."

चाहत्याच्या या प्रश्नाला लगेचच आणि नम्रपणे उत्तर दिले, "मी फक्त एक सामान्य माणूस आहे जो आपल्या देशातील इतर सामान्य लोकांशी जोडण्याचा प्रयत्न करतो."पुन्हा एकदा सोनुच्या या प्रतिक्रियेने चाहत्यांची मन जिकंली.

(Sonu Sood conducted an ‘Ask Me Anything’ session)

Ask Sonu Sood
Salman Khan Threat: मुसेवालाला गोळी घातली आता सलमानची बारी... गोल्डी ब्रारची पुन्हा खुल्लेआम सलमानला धमकी

तर याच सत्रात एका चाहत्याला त्याला यश आणि आनंदाचे रहस्य काय असं विचारल्यावर त्याने "तुमच्या आईवडिलांची प्रार्थना" आहे.

तर एकानं त्याला त्याची आवडती डिश कोणती हे विचारलं तेव्हा त्याने, "मकई की रोटी और सरसों का साग' सांगितलं.

तर सोनु सूद राजकारणात येणार का असा प्रश्न विचारल्यावर त्याने 'देवालाच माहित' असं सांगितले.

Ask Sonu Sood
Fighter First Look: 'हा तर स्वस्तातला टॉम क्रूझ'! Hrithik Roshanच्या 'फाइटर' चा लुक रिलिज

सोनू सूद लवकरच 'फतेह' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाठी त्याने खूपच मेहनत घेतली आहेत. दरम्यान, त्याचा वर्कआउट व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो हिमाचलमधील पर्वतांमध्ये शर्टलेस वर्कआउट करताना दिसत आहे.

'फतेह' हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात सोनू एका दमदार खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

शक्ती सागर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जो सोनू सूदच्या स्वतःच्या होम प्रॉडक्शनचा आहे.

जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अजून समोर आलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com