South Cinema : साऊथचा 'हा' बिग बजेट चित्रपट करणार राडा, तीन सुपरस्टार दिसणार एकत्र! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

South Cinema

South Cinema : साऊथचा 'हा' बिग बजेट चित्रपट करणार राडा, तीन सुपरस्टार दिसणार एकत्र!

South Cinema : साऊथमधील चित्रपट चांगलेच चर्चेत असतात. केजीएफ, पुष्पा असे अनेक चित्रपटांनी राडा केला आणि रेकॉर्डतोड कमाई केली. आणखी एक ढासू साऊथ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

साऊथ सुपरस्टार रजनीकांतनी (Rajinikanth) आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली होती. त्यांनी चित्रपाचे पोस्टर देखील रिलीज केले होते. 

रजनीकांत यांनी या सिनेमासाठी दिग्दर्शक नेलसन दिलीप कुमार यांच्यासोबत करार केला आहे. मात्र या चित्रपटामध्ये साऊथमधील दिग्गज कलाकार दिसणार असल्याची शक्यता आहे. 

हेही वाचा: Eknath Shinde: राष्ट्रवादीचे नेते अन् मुख्यमंत्र्यांमध्ये पत्रव्यवहार; काय आहे कारण?

जेलर चित्रपटाची प्रोडक्शन कंपनी सन पिक्चरने सोशल मीडियावर अभिनेते मोहनलाल यांचे पोस्टर रिलीज केले आहे. जेलरच्या सेटवरुन लालटेन मोहनलाल, असे कॅप्शन पोस्टरला दिले आहे. 

पोस्टरमध्ये मोहनलालचा लूक खूपच जबरदस्त दिसत आहे. त्यामुळे चाहते वेडे झाले आहेत. मोहनलाल आणि रजनीकांतचे चाहते कमेंटचा वर्षाव करत आहेत. 

हेही वाचा: CCTV Footage Viral : असा हा 'चाकं'चोर! गाडीचं चाक चोरलं अन् त्याजागी लावलं...

मोहनलाल यांच्या पोस्टरवर चाहते म्हणाले, वेलकम सर आता जेलर चित्रपटावा बूस्ट मिळेल. दोन लिजेंट एकत्र दिसणार आहेत. या सिनेमात कन्नड अभिनेता शिवराजकुमार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

रजनीकांत आणि मोहनलाल ८ आणि ९ जानेवारी रोजी चेन्नईमध्ये 'जेलर' चित्रपटाची शूटिंग करतील असा दावा यापूर्वी करण्यात आला होता. हे २-३ दिवसांचे शूट असेल.

आतापर्यंत कोणता स्टार कोणती भूमिका साकारणार हे समोर आलेले नाही. मात्र शिवराजकुमारप्रमाणेच मोहनलालचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका असणार हे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: टीम इंडियाला धक्का; Jasprit Bumrah वनडे सीरीजमधून आऊट