अल्लु अर्जुनची आरहा कसली गोड दिसतेयं, तिचा 'अंजली' व्हिडिओ पाहिलायं ?

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 21 November 2020

अल्लुने आरहाच्या वाढदिवसानिमित्ताने अंजली अंजली नावाचं एक खास कव्हर तयार केलं आहे. ते सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. त्यात चार वर्षांची आरहा कमालीची गोड दिसते आहे.

मुंबई - दाक्षिणात्य चित्रपटांतून बॉलीवूडमध्येही कमालीचा लोकप्रिय झालेला अल्लु अर्जुन हा सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. सध्या त्याने त्याच्या मुलीचा आरहाचा एक व्हिडिओ पोस्ट शेयर केला आहे. याचे औचित्य म्हणजे तिचा जन्मदिवस हे आहे. अंजली अंजलीच्या नावाने तयार करण्यात आलेल्या व्हिडीओला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

अल्लुने आरहाच्या वाढदिवसानिमित्ताने अंजली अंजली नावाचं एक खास कव्हर तयार केलं आहे. ते सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. त्यात चार वर्षांची आरहा कमालीची गोड दिसते आहे. त्यात तिचे एक्स्प्रेशन पाहण्यासारखे आहेत. अल्लुने तिला जन्मदिनाच्या निमित्ताने गिफ्ट दिले आहे.

शनिवारी सकाळीच अल्लुने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. 'माझ्या लाडक्या आरहाला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा, तिचं लाघवी हसणं, बोलणं हे मला खूप आनंद देणारे आहे. माझ्या लाडक्या परीला मी मनापासून शुभेच्छा देतो. अशा शब्दांत अल्लुने शुभेच्छा दिल्या आहेत.

छोट्याशा परीला अल्लुने एक सरप्राईज दिले आहे. त्यात त्याने तिला तिच्या आवडीची भेटवस्तु दिली आहे. त्यासाठी अल्लुच्या पूर्ण परिवाराने मेहनत घेतली आहे. 3 मिनिटे आणि 33 सेकंदाच्या या गाण्यात आरहाचा लुक एकदम क्युट आहे. ती यात तिचा भाऊ आयन आणि तिच्या मित्रांबरोबर मुक्तपणे बागडत आहे.

अमिताभ यांच्याकडे नाहीये एकही ATM कार्ड, स्वतः केला खुलासा

गाण्याच्या शेवटी अल्लुला एक खास अॅपियरन्स यावेळी त्याच्या चाहत्यांना पाहता येणार आहे. 1990 मध्ये आलेल्या अंजली  चित्रपटातील या गाण्याची ट्युन ही प्रसिध्द संगीतकार इल्लाईराजा यांनी तयार केली होती. 

हे ही वाचा: शाहरुखच्या घरात एक रात्र राहण्याची जबरदस्त संधी, इथे करा अर्ज आणि...  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: South star Allu Arjun makes a special cover of Anjali Anjali his Arha's birthday