
RRRला ऑस्करसाठी मिळावा म्हणून पाण्यासारखा पैसा वाहिला! अफवांवर राजामौलीच्या मुलाने मौन सोडले
यंदाचा ऑस्कर भारताने चांगलाच गाजवला. 'आरआरआर'ने ऑस्कर जिंकून इतिहास रचला. या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा अकादमी पुरस्कार मिळाला. यावेळी ऐकीकडे सर्व भारतीय या विजयाचा आनंद साजरा करत होते त्याचवेळी या विजयानंतर अनेक अफवा पसरवण्यास सुरुवात झाली.
RRR च्या टीमने ऑस्करसाठी 80 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा करण्यात आला. त्याचबरोबर ऑस्करमध्ये आरआरआर च्या प्रमोशनमध्ये आणि ऑस्करमध्ये सहभागी होण्यासाठी राजामौली यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला अशा अनेक अफवा पसरवल्या गेल्या. आता या सर्व अफवांवर एसएस राजामौली यांचा मुलगा कार्तिकेयने प्रतिक्रिया दिली आहे.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कार्तिकेयने ऑस्करबद्दल सांगितले, “ऑस्कर एक संस्था आहे ज्याचा 95 वर्षांचा इतिहास आहे. तिथं काही घडतं ते सर्व एका प्रक्रियेनुसार घडते. आपण लोकांचे प्रेम विकत घेऊ शकत नाही. चाहत्यांनीच आम्हाला भरपूर प्रसिद्धी दिली आहे.
प्रमोशनमध्ये 80 कोटी रुपयांच्या खर्चा करण्यात आल्याच्या दाव्यावर कार्तिकेयने सांगितले की त्यांची योजना होती की त्यांनी हा सर्व सोहळ्यात केवळ 5 कोटींमध्ये कव्हर करावा, परंतु सर्व सोहळाला त्यांना 8.5 कोटी रुपये खर्च आला. त्याने सांगितले की, चित्रपटाच्या प्रदर्शनावर सर्वाधिक पैसा खर्च करण्यात आला होता, ज्यामध्ये मतदारही सहभागी झाले होते.
पैसे देऊन ऑस्कर समारंभात सहभागी होता का याबद्दल विचारल्यावर कार्तिकेयने सांगतिले की या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी टीमने खूप पैसे खर्च केले.
त्यांने सांगितले की, “राम चरण, जूनियर एनटीआर, कीरावणी, चंद्र बोस यांना ऑस्करचं धिकृत निमंत्रण मिळालं होते. प्रत्येक नॉमिनीकडे काही जागा होत्या, ज्यामध्ये तो त्याच्यासोबत काही लोकांना घेवून जावु शकत होता. पण सर्वजण कोण एकत्र येत आहेत हे सांगण्यासाठी अकादमी पुरस्कारांना मेल पाठवावी लागला.
कार्तिकेय पुढे म्हणाला की तिथे बसण्यासाठी वेगवेगळे क्लास असतात, ज्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात. आम्ही खालच्या विंगमधील एका सीटसाठी सुमारे 1 लाख 23 हजार रुपये तर वरच्या बाजूला चार जागांसाठी 750 डॉलर्स म्हणजेच 61 हजार रुपये दिले होते आणि हे सर्व नियमांनुसार झालं होतं.