esakal | अयोध्येतील राममंदिराची कथा येणार चित्रपटरुपात; पहलाज निहलानी करणार दिग्दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

अयोध्येतील राममंदिराची कथा येणार चित्रपटरुपात; पहलाज निहलानी करणार दिग्दर्शन

त्यांनी या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टरही शेअर केले आहे. ज्यात भगवान राम यांचे अ‍ॅनिमेटेड पोर्ट्रेट दाखवण्यात आले आहे. चित्रपटाच्या कलाकारांची अद्याप घोषणा झालेली नाही.

अयोध्येतील राममंदिराची कथा येणार चित्रपटरुपात; पहलाज निहलानी करणार दिग्दर्शन

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे

मुंबई : 'इल्जाम', 'हथकडी', 'आंखे' अशा लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती करणारे पहलाज निहलानी अयोध्येत बांधण्यात येणारे राममंदिर आणि एकूणच भूमिपूजनाचा सोहळा यावर 'अयोध्या की कथा' हा चित्रपट बनविणार आहेत. ते स्वतः  या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून नोव्हेबर महिन्यापासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

गेल्या काही वर्षात रियाच्या संपत्तीत सातत्याने वाढ; ईडीकडून होणार मालमत्तांविषयी चौकशी  

काल 5 ऑगस्ट 2020 हा दिवस संपूर्ण देशात जल्लोषात साजरा करण्यात आला. याचे कारण होते अयोध्या येथे बांधण्यात येणाऱ्या राममंदिराचे भूमीपूजन. याच पार्श्वभूमीवर चित्रपट निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी त्यांच्या आगामी "अयोध्या की कथा" या चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट हिंदीबरोबरच अन्य भाषांतही बनविण्यात येणार आहे.

मुंबईत पुन्हा महाभयंकर पाऊस होऊ शकतो, 'ही' आहे तारीख....

व्यापार विश्लेषक कोमल नाहटा यांनी ट्विटरवर या चित्रपटाची घोषणा केली. त्यांनी ट्वीट केले, पहलाज निहलानी यांचा "अयोध्या की कथा" या चित्रपटाचे शूटिंग 21 नोव्हेंबरपासून शूटिंग सुरू होणार आहे. हा एक बहुभाषिक चित्रपट असून यात अनेक नामवंत कलाकार असणार आहेत. हा चित्रपट दिवाळी 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे."

मोठी बातमी : 5 ऑगस्टपासून सुरू झालेले मॉल 6 ऑगस्टपासून बंद, महापालिका आयुक्तांचा निर्णय

या घोषणेबरोबरच त्यांनी या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टरही शेअर केले आहे. ज्यात भगवान राम यांचे अ‍ॅनिमेटेड पोर्ट्रेट दाखवण्यात आले आहे. चित्रपटाच्या कलाकारांची अद्याप घोषणा झालेली नाही. पहलाज निहलानी यांचा रिलीज झालेला आतापर्यंतचा शेवटचा चित्रपट म्हणजे "रंगीला राजा" हा कॉमेडी चित्रपट. ज्यात अभिनेता गोविंदा डबल-रोलमध्ये दिसला आहे. तसेच या चित्रपटात मिशिका चौरसिया, शक्ती कपूर, दिगंगना सूर्यवंशी, अनुपमा अग्निहोत्री आणि प्रेम चोप्रा यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. त्यामुळे आता त्यांच्या अयोध्या की कथा या चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
----
संपादन : ऋषिराज तायडे