
'प्रेमाला विरोध नाही, पण माझ्या काही अटी आहेत' : शाहरुखची हट्टी अभिनेत्री
Bollywood News: बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या (Bollywood Actor Shahrukh Khan) चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. काही वर्षांपूर्वी त्याच्या कभी हा कभी ना या (Bollywood Movie) चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंद केले होते. त्यामध्ये त्याची अभिनेत्री म्हणून सुचित्रा कृष्णमुर्तीनं (Suchitra Krishnamoorthi) काम केलं होतं. त्यानंतर ती फारशी चित्रपटामध्ये काही दिसली नाही. मात्र त्या चित्रपटानं तिनं मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. आता ती एका वेब सीरिजच्या निमित्तानं प्रेक्षकांसमोर येणार आहे. तिनं काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक वक्तव्य केलं होतं. ते तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित होतं.त्यामध्ये आपला प्रेमाला विरोझ नाही पण ते आपण सांगु त्यानुसार झालं पाहिजे. मी सांगेल तसा वागणारा माझा पार्टनर हवा. यासारख्या अनेक अटी सुचित्राच्या होत्या. तिची एक मुलाखत सध्या चर्चेत आली आहे. त्यामध्ये तिनं लग्नाविषयी खुलासा केला आहे. तिचा 2007 मध्ये घटस्फोट झाला होता. तिला एक मुलगीही आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुचित्रानं सांगितलं की, मी नेहमीच आयुष्याच्याबाबत वेगळ्या प्रकारे विचार केला होता. आयुष्य हे कुणाच्या सांगण्यानुसार नव्हे तर स्वताच्या अटींवर जगायचं असं मी मानत होते. आणि अजुनही माझी तिच धारणा आहे. सुरुवातीच्या काळात मी संगीत रजनीचे शंभराहून अधिक कार्यक्रम केले होते. त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे मी लोकप्रियही झाले. एका चित्रपटासाठी निवड झाली होती. लग्नानंतर मी अॅक्टिंग सोडली. आणि गृहिणी झाले. ड्रामा क्वीन नावाचं नाटक मी आता करत असून त्याला संगीतही मी दिलं आहे. हे नाटक मी लिहिलेल्या एका पुस्तकावर आधारित आहे. चित्रपटांमध्ये पुन्हा येण्याविषयी सुचित्रानं सांगितलं की, मी आता दोन वेबसीरिज केल्या आहेत. माझी मुलगी जेव्हा कॉलेजला जायला लागली त्यानंतर मी पुन्हा इंडस्ट्रीमध्ये येण्याचा निर्णय घेतला.
घटस्फोटानंतर सुचित्रानं तिच्या मुलीचा सांभाळ केला. सिंगल मदर म्हणून तिनं मोठ्या संकटांचा सामना केला आहे. मला चित्रपटाच्या अनेक ऑफर आल्या होत्या. मात्र त्या मला माझ्या वैयक्तिक कारणामुळे स्विकारता आल्या नाहीत. चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा असूनही मला त्यात काम करता आले नाही. याचे कारण कौटूंबिक जबाबदारी. माझा प्रेमाला विरोध नाही. पण ते मी सांगेल तसं करणारा व्यक्ती हवा. त्यात कोणत्याही प्रकारची सक्ती नको. सक्ती आली की त्या नात्यातील गोडवा हरवतो आणि नात्यामध्ये औपचारिकता उरते. मी आता यासगळ्या परिस्थितीतून बाहेर आले आहे. शेखर कपूर यांच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर सुचित्रा पुन्हा कधीही रिलेशनशिपच्या चर्चेत आली नव्हती. मला असं वाटत नाही की मला कुणाची गरज आहे. अशा शब्दांत तिनं प्रतिक्रिया दिली होती.