प्रभासला चाहत्यानं लिहीलं 'Suicide Letter'; म्हणाला,'स्वतःला संपवीन जर...'

सोशल मीडियावर सध्या प्रभासच्या या चाहत्याचं हे 'Suicide Letter' जोरदार व्हायरल झाल आहे.
Prabhas
PrabhasGoogle

तेलुगू सुपरस्टार प्रभासचे(Prabhas) चाहते जगभरात पसरले आहेत. 'बाहुबली' चे दोन्ही भाग हिट झाल्यानंतर प्रभासच्या चाहत्यांच्या संख्येत आता मोठी वाढ झाली आहे. दक्षिणेत तर चाहते आपल्या या फेव्हरेट सुपरस्टारसाठी टोकाचा वेडेपणा करताना अनेकदा दिसतात. आता प्रभासच्या अशाच एका वेड्या चाहत्यानं चक्क त्याला धमकी दिली आहे. या चाहत्यानं प्रभासला लिहीलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Prabhas
लेकीला बॉलीवूड पदार्पणावर शाहरुखनं दिले खास सल्ले; काय म्हणाला किंग खान?

प्रभासच्या या चाहत्यानं त्याच्या आगामी 'सलार' सिनेमासंदर्भात अभिनेत्याला धमकी दिली आहे. त्याची मागणी आहे की,''प्रभासनं या सिनेमासंदर्भात काहीच अपडेट दिली नाही तर तो स्वतःचं आयुष्य संपवेल''. 'सलार' सिनेमाच्या मेकर्सनी या सिनेमासंदर्भात कोणतीही माहिती बाहेर लीक होऊ नये म्हणून खूप काळजी घेतली आहे. पण चाहते मात्र सिनेमा संदर्भात जाणून घ्यायला उत्सुक आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रशांत नील करीत आहे. प्रशांत नीलच्या KGF2 सिनेमानं जगभरात करोडोची कमाई करून मोठा रेकॉर्ड केला आहे.

Prabhas fan's Viral Suicide Letter
Prabhas fan's Viral Suicide LetterGoogle

प्रभासच्या चाहत्यानं आपल्या पत्राला 'सुसाइड लेटर' असं संबोधलं आहे. हे लेटर इंटरनेटवर जोरदार व्हायरल झालं आहे. चाहत्यानं लिहिलं आहे की,''मी खूप दुखी आणि निराश आहे कारण असंच 'साहो','राधे श्याम' आणि प्रभासच्या याआधीच्या सिनेमां बाबतीत झालं. जर मला या महिन्यात 'सलार' सिनेमाची झलक पहायला मिळाली नाही तर मी आत्महत्या करणार आहे. मला सलार सिनेमा संदर्भात अपडेट हवी आहे''.

Prabhas
Indian Police Force: ॲक्शन सीन करताना सिध्दार्थ मल्होत्रा जखमी

'सलार' सिनेमा संदर्भात बोललं जात आहे की हा सिनेमा प्रभासच्या आतापर्यंतच्या करिअर मधला सर्वात थ्रीलिंग आणि हिंसक सिनेमा आहे. या सिनेमाला प्रशांत नीलनं लिहिलं आहे. सिनेमात प्रभास सोबत श्रृति हासन,पृथ्वीराज सुकुमारन,दिशा पटानी ,जगपति बाबू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. २०२२ संपता संपता या सिनेमाचं शूटिंग पूर्ण होईल असं बोललं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com