Sukhwinder Singh: श्रेय न देता रिमिक्स बनवणं क्रिएटिव्हीटी नव्हे 'भ्रष्टाचार' |Sukhwinder Singh angry new composer | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sukhwinder Singh News

Sukhwinder Singh: श्रेय न देता रिमिक्स बनवणं क्रिएटिव्हीटी नव्हे 'भ्रष्टाचार'

Sukhwinder Singh: आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीतील गायकीमुळे जगभर प्रसिद्ध झालेल्या सुखविंदर सिंग यांचा चाहतावर्ग मोठा आहे. बॉलीवूडमध्ये अमाप लोकप्रियता वाट्याला आलेल्या सुखविंदर सिंग यांच्या गाण्यांना मिळालेला (Bollywood Celebrity) प्रतिसादही तितकाच मोठा आहे. सध्या ते त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. सोशल मीडिय़ावर सक्रिय असणाऱ्या सुखविंदर सिंग यांना परखडपणासाठी देखील ओळखले जाते. सध्याच्या काळात रिमिक्स (Bollywood Singer Sukhwinder Singh) गाण्यांना मिळणारा श्रोतृवर्ग लक्षणीय आहे. त्यावरुन अनेक सेलिब्रेटींनी नाराजीही व्यक्त केली आहे. आता त्यात सुखविंदर सिंग यांचीही भर पडली आहे. नवोदित कंपोझर रिमिक्स तयार करताना जी चूक करतात ती त्यांना मान्य नाही.

गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडमधील क्लासिक म्हणून लोकप्रिय असणाऱ्या (Entertainment News) गाण्यांचे रिमिक्स करण्याची मोठी शर्यत लागली आहे. त्यातील काही गाण्यांना चाहत्यांकडून पसंती मिळते आहे. मात्र काहींच्या वाट्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. यासगळ्यात त्या गाण्यांचे संगीतकार, गीतकार यांनी जेव्हा आपल्या गाण्याचे रिमिक्स तयार केले जाते तेव्हा त्यात श्रेय नामावलीचा कोणताही उल्लेख नसल्याचे सांगितले आहे. त्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. सुखविंदर सिंग यांनी या गोष्टीकडे लक्ष वेधले असून इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीमधून अशा संगीतकारांवर तीव्र शब्दांत निशाणाही साधला आहे.

सुखविंदर सिंग यांनी करण मल्होत्रा दिग्दर्शित समशेरामध्ये तीन गाणी गायली आहेत. ती सध्या चर्चेत आहेत. यानिमित्तानं घेण्यात आलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडमधील संगीत क्षेत्राकडे पाहतो तेव्हा त्याबद्दल नाराजी वाटते. ती म्हणजे त्यात जे चौर्यकर्म सुरु आहे त्याकडे कुणी गांभीर्यानं पाहायला तयार नाही. जे नवोदित संगीतकार आहेत त्यांच्याकडे क्रिएटिव्ह म्हणून पाहिले जाते मात्र प्रत्यक्षात ते क्रिएटिव्हच्या नावाखाली काय करतात हे आपण जाणून घेतले पाहिजे.

हेही वाचा: Bollywood Top 10 : अमिताभ, शाहरुख, सलमान कोणीच नाही! आहे तरी कोण?

जे गायक जुन्याच गाण्यांना नवा साज चढवून गातात. त्याला आपण रिमिक्स म्हणतो. हल्ली क्रिएटिव्हीटीच्या नावाखाली काहीही खपवून घेतले जाते. तेव्हा मला त्या गायकांना आणि संगीतकारांना सांगायचे आहे की, आपण किमान ज्या संगीतकार, गायक आणि गीतकाराच्या गाण्याचे रिमिक्स म्हणून कंपोझिशन केले आहे त्याला क्रेडिट द्यायला हवे. तसे न केल्यास तो भ्रष्टाचार आहे. या शब्दांत सुखविंदर सिंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: IIFA 2022: गाढवावर बसून आयफा शो मध्ये दोन बॉलीवूड सेलिब्रेटींची हजेरी

Web Title: Sukhwinder Singh Angry New Composer Crate Remixing Without Crediting Called Corruption

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..