
Sumitra Sen : 'आई आम्हाला सोडून निघून गेली!' प्रसिद्ध गायिका सुमित्रा कालवश
Sumitra Sen Ravindra Sangeet Singer passed away age 89 : आपल्या बहारदार गायनानं चाहत्यांना अवीट सुरांचा स्वरानंद देणाऱ्या गायिका सुमित्रा सेन यांचे निधन झाले आहे. त्या ८९ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या श्वसनाच्या विकारानं त्रस्त होत्या. त्यांच्या निधनानं भारतीय संगीत विश्वाची मोठी हानी झाली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुमित्रा या बऱ्याच दिवसांपासून ब्रोको निमोनियानं त्रस्त होत्या. त्यांनी कोलकातामधील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. सुमित्रा या रवींद्र संगीत गायनासाठी प्रसिद्ध होता. केवळ भारतात नाहीतर जगात त्यांचे चाहते होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. अनेक गायकांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांना २१ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Also Read - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट
हेही वाचा: Video Viral : भगव्या बिकीनीवरून पेटलेला वाद आईस्क्रीमपर्यंत; महिलेने कँडी चाटत...
सुमित्रा सेन यांच्या मुलीनं सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत त्यांच्या निधनाची बातमी सांगितली आहे. सुमित्रा यांना दोन मुली असून त्या रवींद्र संगीतामध्ये लोकप्रिय गायिका म्हणून परिचित आहेत. त्यांची मुलगी श्रावणी यांनी पोस्ट शेयर करताना म्हटलं आहे की, आई आम्हाला आज सकाळी सोडून गेली. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या.
हेही वाचा: Ved Review : रितेश-जेनेलियाचा प्रेमात पाडणारा 'वेड'! अभिनय, गाणी सगळंच 'लई भारी'
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुमित्रा सेन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, त्यांच्या जाण्याचे वृत्त कळताच मला खूप मोठा धक्का बसला आहे. त्यांनी कित्येक दशकं आपल्या गायकीनं चाहत्यांना सुरानंद दिला. त्या नेहमीच त्यांच्या आवाजाच्या रुपानं आपल्यात राहतील. त्यांच्या कुटंबियांप्रती मी सहानुभूती व्यक्त करते.